वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 जणांचा मृत्यू, 13 जखमी Saam Tv
देश विदेश

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 जणांचा मृत्यू, 13 जखमी

जम्मू- काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : जम्मू- काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) वैष्णोदेवी मंदिरात (Vaishnodevi temple) चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये १२ भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर १३ पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता कटरा येथे वैष्णो देवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी वैष्णोदेवी मंदिर भवन परिसरात शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण जखमी झाले आहेत. तसेच, चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलीस (Police) नियंत्रण कक्षाने यावेळी सांगितले आहे.

सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रियासी येथील नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार की, कटरा येथील माता वैष्णोदेवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोक जखमी झाल्याचे माहिती मिळाली असून सध्या बचावकार्य सुरू आहे. चेंगराचेंगरीनंतर प्रशासन आणि व्यवस्थापनाने पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी वैष्णो देवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांसाठी १० लाख रुपये आणि जखमींना २ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

SCROLL FOR NEXT