Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price 19 July: कच्चा तेलाची उसळी, अनेक शहरांमधे पेट्रोल-डिझेल महागले

Petrol Diesel Price Today 19 july 2023: दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये आजही इंधनाच्या किमती स्थिर आहेत.

Shivani Tichkule

Petrol Diesel Price in Marathi:  जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती दोन दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वाढू लागल्या आहेत. गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. याचा परिणाम बुधवारी सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून आला. आज नोएडा ते पाटणापर्यंत इंधनाच्या किरकोळ किंमतीत वाढ झाली आहे. दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये आजही इंधनाच्या किमती स्थिर आहेत. (Latest Marathi News)

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, नोएडामध्ये पेट्रोल 35 पैशांनी वाढून 97.00 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 32 पैशांनी महाग होऊन 90.14 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 5 पैशांनी महाग झाले असून ते 96.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. येथे डिझेल 5 पैशांनी महागले असून 89.81 रुपये प्रति लिटर झाले आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल 35 पैशांनी वाढून 107.24 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 32 पैशांनी वाढून 94.04 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 942 रुपये प्रति लिटर आहे.

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT