Politics News: अजित पवारांची पंतप्रधान मोदी, अमित शहांसोबत बंद दाराआड चर्चा; दिल्लीत NDA च्या बैठकीनंतर काय घडलं?

Ajit Pawar Meeting PM Modi and Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात मंगळवारी दिल्लीत एनडीएची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
Maharashtra politics Deputy CM Ajit Pawar meeting with PM Narendra Modi Amit Shah in Delhi
Maharashtra politics Deputy CM Ajit Pawar meeting with PM Narendra Modi Amit Shah in Delhi Saam TV
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Ajit Pawar Meeting PM Modi and Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात मंगळवारी दिल्लीत एनडीएची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला भाजपसोबत असलेले देशातील ३८ पक्षाचे नेते उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची सुद्धा या बैठकीला उपस्थित होती.

दरम्यान, या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंद दाराआड अजित पवारांसोबत चर्चा केली. विशेष बाब म्हणजे बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले. पण त्यांच्यासोबत अजित पवार बाहेर पडले नाही.

Maharashtra politics Deputy CM Ajit Pawar meeting with PM Narendra Modi Amit Shah in Delhi
Shivsena 16 Mla Disqualification: १६ आमदार अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

या नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष बाब म्हणजे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आलेलं नाही.

गेल्या आठवड्यातच अजित पवार अजित पवार यांनी गेल्या आठवड्यातच दिल्लीत अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यावेळीदेखील प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत होते. शपथविधीनंतर प्रोटोकॉल म्हणून अजित पवार हे शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला आल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळी दिली होती.

Maharashtra politics Deputy CM Ajit Pawar meeting with PM Narendra Modi Amit Shah in Delhi
Kirit Somaiya News: भाजप नेते किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरण; मुंबई गुन्हे शाखेकडून तपासाला सुरूवात

दरम्यान, एनडीएच्या बैठकीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रांगेत बसले होते, त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या मधोमध बसले होते. तर अजित पवार हे अमित शाह यांच्या बाजूला बसले होते. पण ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री अशोका हॉटेलच्या बाहेर आले. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि ते विमानतळाच्या दिशेला रवाना झाले. तर अजित पवार आणि मोदी-शाह यांच्यात २० ते २५ मिनिटे बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com