money saam tv
देश विदेश

Telangana News : ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेला ट्रक सहज तपासला; 750 कोटींची रोकड पाहून पोलिसही चक्रावले

Telangan Cash News : युनियन बँक ऑफ इंडियाचे हे पैसे आहेत, जे केरळमधून हैदराबादला ट्रान्सफर केले जात होते.

प्रविण वाकचौरे

Telangana News :

देशात ५ राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणुकांच्या घोषणांनंतर पोलीस प्रशासनासह निवडणूक आयोगही सज्ज झाला आहे.

तेलंगणामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवैध रोकड जप्त करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांना यश येत आहे. मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी रात्री राज्यातील गडवाल येथील राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी 750 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक सापडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संबंधित रोख रक्कम निवडणुकीत वापरली जाणारी असल्याची शंका पोलिसांना आली. मात्र नंतर ही रोकड निवडणुकीशी संबंधित नसल्याचे समोर आले. युनियन बँक ऑफ इंडियाचे हे पैसे आहेत, जे केरळमधून हैदराबादला ट्रान्सफर केले जात होते.

बुधवारी 18 ऑक्टोबर, तेलंगणाचे मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी सांगितले की, बँकेच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केल्यानंतर ट्रक पुढील प्रवासासाठी सोडण्यात आला.

TOI च्या रिपोर्टनुसार, विकास राज यांनी सांगितलं की 750 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या ट्रकबाबत आम्हाला संशय आला. मात्र काही तास चौकशी केल्यानंतर ट्रक सोडून देण्यात आला. (Latest Marathi News)

165 कोटींचा मुद्देमाल जप्त

निवडणुकीच्या घोषणेनंतर तेलंगणात पोलीस सतर्क झाले आहेत. तेलंगणात आतापर्यंत जवळपास 165 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ज्यात रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, सोने आणि मौल्यवान रत्नांचा समावेश आहे. जप्त केलेले सोने, हिरे आणि मौल्यवान धातूंची किंमत 62 कोटी रुपये आणि रोख रक्कम 77 कोटी रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT