Gold Silver Price Down Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price Down : सुवर्णसंधी ! सोन्याच्या दरात घसरणं; तर चांदीही झाली स्वस्त, तपासा आजचे दर

Gold Silver Price In Maharashtra : काल सोन्याच्या दराने ६२ हजारांचा आकडा पार केला होता.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : सोन्या-चांदीच्या दरात सात्तत्याने बदल असतात. काल सोन्याच्या दराने ६२ हजारांचा आकडा पार केला होता तर आज जागतिक ट्रेंडमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

भारतीय (India) सराफ बाजारात सोन्याचे भाव घसरले आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी 61,370 रुपये मोजावे लागणार आहे तर एक किलो चांदीचा (Silver) भाव 75,950 रुपये आहे. अशी माहीती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे.

दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा दर हा 330 रुपयांनी घसरला तर चांदीच्या दरात 1650 रुपयांनी घसरण झाली आहे. आज सोने 61,370 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आणि चांदीचा भाव 77,800 रुपये प्रति किलो झाला आहे.

1. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

2.   हॉलमार्कचे (Hallmark)  सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold)  खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

SCROLL FOR NEXT