Gold Silver Price Down Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price Down : सुवर्णसंधी ! सोन्याचे भाव 450 रुपयांनी घसरले; चांदीचा दरही नरमला, तपासा आजचे दर

Gold Price In Maharashtra : लग्नसराईचा मुहूर्त संपण्यासाठी काही दिवस बाकी असताना ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : अवघ्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत होती. अशातच आज सोन्याच्या चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली आहे. लग्नसराईचा मुहूर्त संपण्यासाठी काही दिवस बाकी असताना ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे.

आज सराफ बाजारात 22 कॅरेट १० ग्रॅम  सोन्याचा (Gold)  भाव 57,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 60,530 रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव 78,200 रुपये प्रति किलो झाला आहे. (18th May 2023 Update )

सराफ व्यापारी आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मनीष शर्मा यांनी सांगितले की, आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

चांदीच्या भावात 600 रुपयांनी घट झाली असून ती आज 78,200 रुपये प्रति किलो भावाने विकली जाईल. तर काल सायंकाळपर्यंत 78,800 रुपये दराने चांदीची विक्री झाली आहे.

1. सोन्याचे भाव झाले कमी

मनीर्ष शर्मा म्हणतात की, 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 450 रुपयांनी घसरले आहे तर काल संध्याकाळी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 58,100 रुपयांवर होता. आज त्याची किंमत 57,650 रुपये इतकी करण्यात आली आहे.

अर्थात यामध्ये ४५० रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. तर काल 24 कॅरेट सोने हे 61,010 रुपये 10 ग्रॅमवर होते. आज त्याची किंमत (Price) 60,530 रुपये इतकी झाली आहे.

2. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

3.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

SCROLL FOR NEXT