लाल की हिरवा, निरोगी आरोग्यासाठी कोणता सफरचंद फायदेशीर?

Manasvi Choudhary

सफरचंद

सफरचंद हे आरोग्यासाठी सुपरफूड मानले जाते. निरोगी राहण्यासाठी सफरचंद खाण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.

Red VS Green Apple | pintrest

सफरचंदाचे दोन प्रकार

मात्र आता बाजारात लाल आणि हिरवा असे दोन सफरचंदाचे प्रकार पाहायला मिळतात, त्यामुळे नेमका कोणता सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Red VS Green Apple | pinterest

लाल आणि हिरवा

लाल आणि हिरवा या दोन सफरचंदापैकी नेमके कोणते सफरचंद तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Red VS Green Apple

चव

लाल सफरचंद हा चवीला गोड असतो तर हिरवा सफरचंद हा थोडा चवीला आबंट असतो.

Red VS Green Apple

आरोग्यदायी गुणधर्म

लाल सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते, जे शरीरातील पेशींचे रक्षण करतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

Red VS Green Apple

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

हिरव्या सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही हिरवा सफरचंद खाऊ शकता.

Weight Loss | pinterest

मधुमेहासाठी फायदेशीर

हिरवे सफरचंदामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी खाणे फायदेशीर आहे.

diabetes | saam tv

हृदयाचे आरोग्य

लाल सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Heart | pinterest

दोन्हीपैकी कोणते सफरचंद बेस्ट?

वरील आरोग्यदायी गुणधर्मानुसार तुम्ही लाल किंवा हिरवा दोन्ही सफरचंदापैकी कोणता खावा हे ठरवू शकता.

Red VS Green Apple

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Ragi Recipe: नाचणीची फक्त भाकरी नाही, तर 'या' 5 सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा

Ragi Recipe
येथे क्लिक करा...