Manasvi Choudhary
नाचणी आरोग्यासाठी एक अत्यंत औषधी पौष्टिक मानली जाते. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि प्रथिने ही पोषणतत्वे असतात.
आपल्यापैकी अनेक जण नाचणीची भाकरी आवडीने खातात, पण जर तुम्हाला रोजचीच भाकरी खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही नाचणीपासून ५ सोप्या आणि चवदार रेसिपी नक्की ट्राय करा.
नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी बनवायचे असेल, तर नाचणीचा डोसा तुम्ही बनवू शकता. रेसिपी अत्यंत सोपी आहे.
नाचणी डोसा बनवण्यासाठी नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ आणि दही एकत्र करून छान पातळ बॅटर तयार करा. नॉन-स्टिक तव्यावर हा डोसा खमंग आणि कुरकुरीत भाजून घ्या.
तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही नाश्त्यासाठी झटपट नाचणीचा चिला ही रेसिपी ट्राय करा. नाचणीच्या पिठात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण तयार करा.
लहान मुले सहसा नाचणीची भाकरी, नाचणीचे पदार्थ खात नाही तर तुम्ही त्यांच्यासाठी हेल्दी नाचणीपासून पॅनकेक बनवा. यासाठी नाचणीच्या पिठात पिकलेले केळे कुस्करून टाका, त्यात थोडे दूध किंवा पाणी आणि गूळ किंवा मध मिसळून खमंग पॅनकेक तयार करा.
रव्याच्या उपम्याऐवजी काहीतरी नवीन ट्राय करायचे असल्यास नाचणीच्या पिठाचा उपमा बनवू शकता. कढईत मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे आणि आवडीच्या भाज्या परतून घ्या, त्यात नाचणीचे पीठ हलके भाजून पाणी घाला आणि घट्ट होईपर्यंत ढवळा.
गोड खाण्याची इच्छा झाल्यावर पौष्टिक लाडू बेस्ट ऑप्शन आहे. नाचणीचे पीठ तुपामध्ये खमंग भाजून घ्या, त्यात गूळ, थोडे काजू-बादाम आणि ड्रायफ्रुट्स घालून चवदार आणि ताकदवान लाडू वळून घ्या.