Petrol Diesel Prices
Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाचे नवीन दर जाहीर; वाचा तुमच्या शहरात कितीने महागलं पेट्रोल-डिझेल

Ruchika Jadhav

Petrol Diesel Rates: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत रोज बदल होत आहे. देशात गेल्या एक वर्षापासून कच्चा तेलाची किंमत स्थिर आहे. मात्र राज्यपातळीवर इंधनाला लागणाऱ्या टॅक्समुळे पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. रोज सकाळी ६ वाजता भारतीय सरकारी कच्चा तेलाच्या कंपन्या आपले दर जाहीर करतात. आज देखील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात बराच बदल झाला आहे. (Latest Petrol Diedel News)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. प्रति बॅरल $ ७५ या दरावर कच्चे तेल पोहचले आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत ७५.७५ डॉलर इतकी झाली आहे.

गुरुग्राममध्ये पेट्रोल १३ पैशांनी स्वस्त झाले असून ९६.९७ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेल (Diesel) १२ पैशांनी महागले असून ८९.८४ रुपये प्रतिलिटर झाले आहे. नोएडामध्ये पेट्रोल 23 पैशांनी महागले असून 96.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. डिझेल 22 पैशांनी वाढले आहे. येथे 89.93 रुपये प्रति लिटने डिझेल विकले जात आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 108.08 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.36 रुपये प्रति लीटर झाले आहे. लखनऊमध्ये पेट्रोलचे दर 96.57 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत?

  • दिल्लीमध्ये पेट्रोल (Petrol) 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

  • कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT