Vinay Narwal Dancing Video saam tv
देश विदेश

Pahalgam Attack: 'मेरी ख्वाइश तू...' नौदल अधिकाऱ्याचा पत्नीसोबतचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल

Vinay Narwal Dancing Video: नौदल अधिकारी विनय नरवाल अधिकारी आणि हिमांशी यांचा विवाह १६ एप्रिल रोजी झाला होता. लग्नानंतर ते दोघे काश्मीरला फिरायला गेले होते. नेटिझन्सनी मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट X वर एक व्हिडिओ शेअर केलाय.

Bharat Jadhav

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये नरवाल पत्नी हिमांशीसोबत ते "झोल" या पाकिस्तानी गाण्यावर नाचताना दिसताहेत. दरम्यान एका एक्स वापरकर्त्याने पोस्टवर कमेंट करत हा व्हिडिओ विनय नरवाल आणि त्याच्या पत्नीचा नाही, असा दावा केलाय. साम टीव्हीदेखील या व्हिडिओच्या सत्यतेची हमी देत ​​नाही.

मंगळवारी पहलगाम येथे दहशवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात भारतीय नौदलाचे अधिकारी विनय नरवाल याचाही मृत्यू झालाय. विनय नरवाल यांचे लग्न १६ एप्रिल रोजी झालं होतं. लग्नानंतर ते आपल्या पत्नीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. परंतु दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

लग्नाच्या सहाव्या दिवशीच हिमांशू स्वामी यांच्या कपाळावरील कुंकू पूसल्या गेलं. सोशल मीडियावर विनय नरवाल यांच्या मृतदेहाचा आणि त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. आता विनय नरवाल आणि हिमांशू स्वामी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दोन्ही नवरा-बायको 'झोल' चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्याचा अखेरचा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जात आहे.

नेटीझन्सने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलाय. बुधवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर, लेफ्टनंटच्या पत्नीने पतीला अश्रूंनी निरोप दिला. यावेळी पतीच्या पार्थिवाला अलिंगन देत त्या ढसाढसा रडत होत्या. आम्हाला तुझा नेहमी अभिमान राहील, असं म्हणत त्या जोरजोरात रडत होत्या.

आज तिरंग्यात पतीचं पार्थिव पाहिल्यानंतर हिमांशीने मोठा टाहो फोडला. पत्नीचा आक्रोश पाहून देशातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. लेफ्टनंट विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यावेळी पत्नी हिमांशू स्वामी संपूर्ण दिवस आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसून होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: कमी बजेट… अफलातून सजावट! दिवाळीत घर सजवण्यासाठी हे सोपे उपाय वापरून बघा

पुन्हा Ind-Pak ड्रामा! रोहित-विराटकडून पाकिस्तानी चाहत्यांना स्पेशल गिफ्ट, नेमकं काय घडलं? Video

Maharashtra Live News Update: पालघरमध्ये अर्ध्या तासापासून परतीच्या पावसाची दमदार हजेरी

नाल्याच्या पुलावरून स्कूल व्हॅन उलटली अन् 10 विद्यार्थी...; नेमके काय घडले? VIDEO

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता मशाल सोडून कमळ हाती घेणार

SCROLL FOR NEXT