लष्कर-ए-तैयबाचा कमांडर नदीम अबरारला अटक Twitter/@ANI
देश विदेश

लष्कर-ए-तैयबाचा कमांडर नदीम अबरारला अटक

सुरक्षा दलावरील हल्ल्यांमध्येही तो सहभागी होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) कमांडर नदीम अबरार (Nadeem Abrar) याला अटक करण्यात आली आहे. नदीम अबरार हत्येच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होता. नदीम अबरार हे आमच्यासाठी मोठे यश आहे. अशी माहिती आयजीपी काश्मीर विजय कुमार (IGP Kashmir Vijay Kumar) यांनी दिली आहे. (Lashkar-e-Taiba commander Nadeem Abrar arrested)

21 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या सोपोरमधील (Sopor) बडगाम (Badgam) भागात पोलिस आणि सुरक्षा दलातील चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. य़ात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मुदासीर पंडित हादेखील ठार झाला. ही कारवाई सैन्याच्या 22-आरआर (राष्ट्रीय रायफल्स), सोपोर पोलिस आणि सीआरपीएफच्या 179-बटालियनने केली.

बडगाम जिल्ह्यातील नरबळ येथे नदीम अबरारला अटक करण्यात आली आहे. श्रीनगर-बारामुल्ला सीमेवरील अनेक हत्या आणि हल्ल्यांमध्ये तो सामील होता. सुरक्षा दलावरील हल्ल्यांमध्येही तो सहभागी होता. “आमच्यासाठी मोठे यश” असल्याचे मत काश्मीर विजय कुमार यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत बोलताना कुमार यांनी माहिती दिली आहे. नदीम 2018 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांवर आणि नागरिकांवर अनेक हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. ऑल्टो कारमध्ये जात असताना नदीमला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली. नदीमसह आणखी एकास अटक करण्यात आल्याची बातमीही आहे.

कुमार यांनी अटकेसंदर्भात अधिक माहिती दिली नाही, परंतु सुरक्षा दलाने शहराच्या बाहेरील परिमपुरा येथील चेक पोस्टवर अबरार व इतर संशयितांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लावेपुरा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तीन जवानांच्या हत्येमध्ये अबरारचा हात होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाने एक पिस्तूल आणि हँड ग्रेनेड जप्त केले आहेत.

Edited By -Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT