Lal Krishna Advani became emotional after Bharat Ratna award was announced  Saam Tv
देश विदेश

Lal Krishna Advani: भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी झाले भावुक, म्हणाले...

Bharat Ratna: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. यावर अडवाणींच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

Satish Kengar

Lal Krishna Advani:

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. यावर अडवाणींच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांची कन्या प्रतिभा अडवाणी यांनी त्यांचं लाडू देऊन अभिनंदन केले. तसेच लालकृष्ण अडवाणींनी लोकांना हात जोडून अभिवादन केले.

प्रतिभा अडवाणी म्हणाल्या की, '''दादा (लालकृष्ण अडवाणी) यांना देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाल्याने संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. आज मला माझ्या आईची सर्वात जास्त आठवण येते, कारण त्यांच्या (अडवाणींच्या) आयुष्यात त्यांचे योगदान मोठे आहे. मग ते वैयक्तिक असो, वा राजकीय जीवन.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या म्हणाल्या की, ''जेव्हा मी त्यांना हे सांगितले, तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि म्हणाले की, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या देशाची सेवा करण्यात घालवले.'' प्रतिभा अडवाणी म्हणाल्या, ''इतका मोठा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि देशातील जनतेचे आभार मानले." (Latest Marathi News)

प्रतिभा अडवाणी पुढे म्हणाल्या, "ते खूप भारावून गेले आहेत. ते मोजक्या शब्दात आपलं म्हणणं मांडणारे व्यक्ती आहेत. पण त्याच्या डोळ्यात अश्रू होते. राम मंदिराच्या अभिषेकवेळीही ते खूप आनंदी होते. हे त्यांच्या आयुष्यातील एक स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की, जेव्हा कोणी त्यांची स्तुती करतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात."

दरम्यान, भाजप ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले, "'लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आमच्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असलेले अडवाणी यांनी भारताच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. तळागाळात काम करून त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली आणि उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

SCROLL FOR NEXT