Lakhimpur: योगी सरकारच्या तपासावर आम्ही समाधानी नाही: सर्वोच्च न्यायालय Saam Tv
देश विदेश

Lakhimpur: योगी सरकारच्या तपासावर आम्ही समाधानी नाही: सर्वोच्च न्यायालय

लखीमपूर खेरी प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारची भूमिका आणि दृष्टिकोन यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे.

विहंग ठाकूर

विहंग ठाकूर

लखीमपूर खेरी: लखीमपूर खेरी Lakhimpur Khrei Violence प्रकरणात उत्तर प्रदेश Uttar Pradesh Government सरकारची भूमिका आणि दृष्टिकोन यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने म्हटले की, खुनाचे आरोप गंभीर आहेत. कितीही आरोपी असले तरी त्यांच्यावर जशी कारवाई झाली पाहिजे तशी कारवाई आत्तापर्यंत का केली गेली नाही? न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकार सीबीआयला CBI तपास देण्याचा विचार करत आहे का? सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की स्थानिक अधिकारी निष्पक्ष चौकशी कशी करणार आहेत?

हे देखील पहा-

लखीमपूर प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारची भूमिका आणि दृष्टिकोन यावर सर्वोच्च न्यायालय आता कठोर झाले आहे. न्यायालयाने म्हटले की, खुनाचे गंभीर आरोप आहेत. कितीही आरोपी असले तरी त्यांच्यावर जशी कारवाई व्हायला हवी तशी कारवाई का केली गेली नाही? सीबीआय चौकशीची मागणी का झाली नाही? स्थानिक अधिकारी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी कशी करतील? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान, CJI ने सांगितले की, आम्ही कोणतीही टिप्पणी करत नाही. राज्य पावले उचलत आहे आणि सीबीआय या प्रकरणाचा पर्याय नाही. न्यायालयाने सांगितले की, दसऱ्याच्या सुटीनंतर आम्ही या प्रकरणाची सुनावणी करू पण, तोपर्यंत हातावर हात ठेवून बसू नका.

यूपी सरकारने मागितली वेळ;

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हे 8 लोकांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण आहे. सीबीआय चौकशीचा विचार केला आहे का? यूपीतर्फे हजर असलेले ज्येष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले की, राज्याकडून तशी कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. साळवे म्हणाले की, राज्य सरकारला थोडा वेळ द्या, 18 ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी घ्या. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तुम्ही इतर लोकांशी ज्याप्रकारे वागता, त्या बाबतीत तुमच्याशीही असेच वागले पाहिजे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी 23 ऑक्टोबरला करणार आहे.

प्रकरणाचा तपास सुरू आहे;

उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे यांनी सांगितले की, शवविच्छेदनात मृतदेहातून एकही गोळी सापडली नाही. ते म्हणाले की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आणि आमच्याकडे पुरावे आहेत. हरीश साळवे म्हणाले, ज्या व्यक्तीवर हा आरोप केला जात आहे त्याला आम्ही नोटीस बजावली आहे. जर तो हजर झाला नाही तर आम्ही वॉरंट जारी करू असे साळवे म्हणाले. पुढे ते म्हणाले, शवविच्छेदनात गोळ्यांच्या खुणा आढळल्या नाहीत. उच्च अधिकाऱ्यांनी या प्रकरणी निर्देश जारी केले आहेत आणि तपास सुरू आहे.
Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT