लखीमपूर हिंसाचार प्रकरणी कारवाई; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर Saam Tv
देश विदेश

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी कारवाई; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर

यूपीतील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसक चकमकीनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला

विहंग ठाकूर

वृत्तसंस्था : यूपीतील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसक चकमकीनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर खेरी येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, त्याआधी तेथे गोंधळ झाला. एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी टीकोनिया पोलीस स्टेशनमध्ये अजय मिश्राचा मुलगा आशिष याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोप करण्यात आला आहे,  की जेव्हा शेतकरी निषेधासाठी गेले होते. त्याचवेळी कारने त्यांना तुडवले. या दरम्यान, ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर हिंसाचारात एकूण ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या प्रकरणी आशिष मिश्रा यांच्यासह १४ जणांविरोधात खून, गुन्हेगारी कट आणि दंगल यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी त्यांचा मुलगा आशिष मिश्रा गाडी चालवत असल्याचा आरोप फेटाळला आहे.अजय मिश्रा यांनी काही समाजकंटकांना दोष दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT