CM Mohan Yadav transfers the 34th installment of Ladki Bahin Yojana to over 1.25 crore women beneficiaries during an event in Gwalior Saam Tv
देश विदेश

खुशखबर! 1 कोटी 25 लाख लाडकींच्या खात्यात आज १५०० रुपये जमा होणार

Ladki Bahin Yojana 34th Installment Date And Amount: मध्यप्रदेश सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी 25 लाख महिलांच्या खात्यात आज 1500 रुपयांचा 34 वा हप्ता जमा होणार आहे.

Omkar Sonawane

लाडक्या बहीणींना आज 34 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे आज ग्वालियरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते हे डिजिटल माध्यमातून हे पैसे लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होणार आसून ते 122 कोटीचे विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहे. मुख्यमंत्री मोहन यादव शुक्रवारी (दि.13) लाडकी बहीण या संम्मेलनमध्ये सामील होणार आहे. यावेळी ते राज्यातील 1 कोटी 25 लाखापेक्षा अधिक महिलांच्या खात्यात 34 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. यासाठी तब्बल 1836 कोटी इतका निधी खर्च केला जाणार आहे.

34 व्या हप्त्यासोबत 122 कोटी रुपयांच्या 54 कामांचे उद्घाटन

या योजनेअंतर्गत, ग्वाल्हेर जिल्ह्यातील 3 लाख 2 हजार 850 महिलांच्या खात्यात अंदाजे 44 कोटी रुपये हस्तांतरित केले जातील . कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री अंदाजे १२२ कोटी रुपयांच्या ५४ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ देखील करतील. यामध्ये १९ कामांचे उद्घाटन आणि ३५ कामांचे भूमिपूजन समारंभाचा समावेश आहेत.

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने घाटीगावला पोहोचणार

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर, मंत्री तुलसीराम सिलावत, नारायण सिंह कुशवाह, प्रद्युमन सिंह तोमर, भरत सिंह कुशवाह, मोहन सिंह राठोड आणि दुर्गेश कुंवर सिंह जाटव यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजन आणि उद्घाटन होणाऱ्या कामांमध्ये कुलैथ येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम, सांक नदीवरील पूल, कामगार विश्रामगृह, आंबेडकर धाम संग्रहालय, रस्ते बांधकाम आणि शहरी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित इतर कामांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT