Earthquake Google
देश विदेश

Earthquake: होळीच्या दिवशी लडाख हादरलं! ५.२ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के; जम्मू काश्मीरलाही बसला हादरा

Ladakh and Jammu Kashmir Earthquake: होळीच्या दिवशी जम्मू-काश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाने धक्का दिला. लडाखमध्ये ५.२ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Dhanshri Shintre

धूलिवंदनाच्या दिवशी भारताच्या उत्तरेकडील भागात पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीर आणि लडाख भूकंपाने हादरले. राष्ट्रीय भूकंपाशास्त्र केंद्रानुसार लडाखमधील कारगिलमध्ये ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला. जम्मू-काश्मीरच्या विविध भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे २.५० वाजता १५ किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. अचानक भूकंप जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हिमालयीन प्रदेश भूकंपप्रवण झोनमध्ये असल्याने येथे वारंवार भूकंप जाणवण्याची शक्यता अधिक असते.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, भूकंपाचे केंद्र १५ किलोमीटर खोलीवर होते. या भूकंपानंतर अवघ्या तीन तासांत ईशान्य भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग भागात सकाळी ६ वाजता ४.० तीव्रतेचा भूकंप झाला. तसेच, १३ मार्च रोजी दुपारी २ वाजता तिबेटमध्येही ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला. सतत जाणवणाऱ्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.

अरुणाचल प्रदेशात सकाळी ६.०१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र पश्चिम कामेंग होते, तर त्याची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. हा भूकंप १० किलोमीटर खोलीवर झाला. अचानक भूकंप झाल्याने नागरिक घाबरले, मात्र सध्या कोणत्याही मोठ्या नुकसानाची माहिती समोर आलेली नाही.

भारतातील भूकंपीय क्षेत्र चार झोनमध्ये विभागले गेले आहेत, ज्यामध्ये झोन पाच हा सर्वात धोकादायक मानला जातो. या भागात वारंवार भूकंप जाणवतात आणि त्यामुळे मोठ्या नुकसानाची शक्यता कायम असते. याउलट, झोन II मधील भागांत भूकंपाचा धोका सर्वात कमी असतो. देशाची राजधानी दिल्ली झोन IV मध्ये येत असल्याने येथे सौम्य भूकंप जाणवतात. याचा परिणाम परिसरातील इतर भागांवरही होतो. भूकंपीय संवेदनशीलतेमुळे या झोनमध्ये सतत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT