Ladakh Road Accident Saamtv
देश विदेश

Ladakh Road Accident: लडाखमध्ये लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले; ९ जवान शहीद, काही जखमी

Ladakh Road Accident: भारतीय सैन्याच्या जवानांचं वाहन दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत ७ जवानांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

Ladakh Road Accident: लडाखमधून मोठी वृत्त हाती आलं आहे. लडाखच्या कियारी शहरात भारतीय सैन्याच्या जवानांचं वाहन दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत ९ जवानांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत काही जण जखमी असल्याचीही माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, लडाखमध्ये शनिवारी संध्याकाळी लष्काराच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण लडाखमधील न्योमा जिल्ह्यातील कियारीजवळ ही दुर्घटना घडली आहे. कियारीपासून ७ किमी अंतरावर लष्कराचे वाहन दरीत कोसळले.

लडाखमध्ये झालेल्या या अपघातात आतापर्यंत ९ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तसेच काही जवान जखमी देखील झाल्याची माहिती आहे. लेहजवळील कारू चौकीतून असताना हा अपघात झाला. या भीषण अपघातानानंतर बचावकार्य सुरू आहे.

संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे'.

'सैनिकांच्या ताफ्यात ट्रक, रुग्णवाहिका आणि कारदेखील होती. सैनिकांचे तीन वाहने होती. त्यापैकी सैनिकांचा ट्रक खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात दोन कनिष्ठ आयुक्त अधिकारी आणि सात जवानांचा मृत्यू झाला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: कांदिवलीत ऑइलमुळे १४ दुचाकींचे अपघात; अनेक जण जखमी!

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजाचं गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

SCROLL FOR NEXT