Bihar Girl Saam TV
देश विदेश

Girl Students Vandalise Car : बिहारमध्ये विद्यार्थिनींनी शिक्षण अधिकाऱ्यांची गाडी फोडली; मुलींच्या उद्रेकाचं कारण काय?

Viral VIdeo : मुलींनी शाळा प्रशासनाविरोधातही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

प्रविण वाकचौरे

Bihar News :

मुलगी शिकली, प्रगती झाली असं बोललं जातं. मात्र याच मुली थेट शिक्षण अधिकाऱ्याला भिडल्या. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या वाहनाची तोडफोड केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत बसण्याची योग्य व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात मुलींनी रोष व्यक्त केला. संतप्त विद्यार्थिनींनी आधी राष्ट्रीय महामार्ग NH 122B शाळेसमोर रोखून धरला. शाळा प्रशासनाविरोधातही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.  (Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच, महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप मुलींनी केला.

त्यानंतर संतप्त विद्यार्थिनींनी माहनर शिक्षण अधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला केला. मुलींनी गाडीवर जोरदार दगडफेक केली, लाठ्याकाठ्यांनी हल्लाही केला. यामुळे कारचं मोठं नुकसान झालं. मुलींची पोलिसांसोबतही बाचाबाचीही झाली. यात दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे.

मुलींच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मुलींनी शांतता बाळगावी, असं आवाहन पोलिसांना केलं आहे. तसेच मुलींना शाळेत बसण्याची अडचण निर्माण होत असेल तर दोन शिफ्टमध्ये वर्ग घेण्याचा शाळा प्रशासन विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींचं नशीब चमकणार; शतांक योगाने नुसता पैसाच नाही तर करियरमध्येही मिळणार संधी

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

SCROLL FOR NEXT