Winter 2025  Saam tv
देश विदेश

Winter 2025 : गरम कपडे तयार ठेवा! यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

La Nina Effect : यंदा कडाक्याची थंडी पडणार आहे. होत तज्ञांनी हा अंदाज व्यक्त केलाय. हिवाळ्यात नेमकं काय घडणार आहे? हवामानात काय बदल होणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Suprim Maskar

यंदा भारतात कडाक्याची आणि हाडं गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता

ला-नीना हवामान प्रक्रियेचा प्रभाव यामागे कारणीभूत

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान La Niña 71% सक्रिय असण्याची शक्यता

हवामान बदलामुळे देशातील वातावरणात मोठा बदल झालाय. त्यातच प्रत्येकवर्षी तापमानात कमालीची घट होतेय. अवकाळी पाऊस, भूस्खलन अशा घटना वारंवार घडतायत.. लवकरच हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. जास्त थंडी पडण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत.. ते पाहूयात..

ला-नीना कार्यरत झाल्यामुळे तापमानात मोठी घट होऊ शकते. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ला-नीना (La Niña) 71 टक्क्यांपर्यंत अॅक्टिव्ह राहण्याची शक्यता आहे. ला-नीना ही एक हवामान प्रक्रिया असून ला-नीनामुळे पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राचे पाणी सामान्यपेक्षा थंड होते. यामुळे जागतिक हवामानावर परिणाम होतो. डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 यादरम्यान La Niña चा प्रभाव कमी होऊन 54 टक्क्यांपर्यंत राहू शकतो. त्यामुळे हवामानात गारवा वाढणार आहे. जगातील हवामानाचा पॅटर्न बदलला असून भारतात दरवर्षीपेक्षा जास्त थंडी पडू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटलेय.

ला- नीनाचा परिणाम फक्त पॅसिफिक महासागरापुरताच मर्यादित नाही, तर संपूर्ण जगाच्या हवामानावर याचा परिणाम होतो. भारतात ला-नीना फक्त हिवाळ्यामध्ये तापमान कमी-अधिक करतो. त्यामुळे हाडं गोठवारी थंडी पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र त्यातच यंदा कमी कालावधीपुरता ला-नीनाचा प्रभाव पडण्याची शक्यताही काही तज्ज्ञांनी वर्तवलीय. त्यामुळे जर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान -0.5 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेले आणि ही स्थिती सलग तीन महिने राहिली तर अधिकृतपणे ला-नीना प्रक्रिया घोषित केली जाईल. त्यामुळे थंडीला सामोरे जाण्याची तयारी आत्तापासून करुन ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Farmer Protest : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर रेल्वे बंद करू; बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा, VIDEO

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: जरांगे पाटील बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी नागपूरला रवाना

SCROLL FOR NEXT