Indian student in Kyrgyzstan 
देश विदेश

Kyrgyzstan: किर्गिस्तानमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांनंतर भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Indian student in Kyrgyzstan: किर्गिस्तानमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील ५०० विद्यार्थी अडकले असल्याची माहिती मिळालीय. येथे शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवरही हल्ले होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(प्रमोद जगताप, साम प्रतिनिधी)

किर्गिस्तानमधील बिश्केकमध्ये परदेशी विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केला जात आहे. तेथील स्थानिक विद्यार्थी इतर देशांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ले करत असल्याची घटना घडत आहेत. पाकिस्तानी विद्यार्थी आणि किर्गिस्तानमधील विद्यार्थीमध्ये वाद झाल्यानंतर तेथील विद्यार्थी हे बांगलादेश, आणि पाकिस्तानासह भारतीय विद्यार्थ्यांवरही हल्ला केले जात आहेत. परदेशी विद्यार्थ्यावर हल्ला होत असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

किर्गिस्तानमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील ५०० विद्यार्थी अडकले असल्याची माहिती मिळालीय. हे विद्यार्थी संभाजीनगर, धाराशिव आणि बीड जिल्हातील आहेत. दरम्यान किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अहमदनगर / अहिल्यानगरच्या कर्जतचा विशाल राऊत याचाही समावेश आहे. विशाल एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. विशाल त्याच्या पालकांशी संपर्कात आहे. विशालची मोठी बहीण सोनाली राऊत हिने तेथील परीस्थिती संदर्भात माहिती दिलीय.

किर्गिस्तानमधील परिस्थितीमुळे पालक चिंतेमध्ये आहेत. अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष संपलेला आहे. त्यामुळे ते परतत आहेत. तेथील परिस्थिती सध्या निवळलेली आहे, मात्र अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी पालकांची अपेक्षा आहे. ⁠शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक महिन्याचं शिक्षण अद्याप पूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे किर्गिस्तानमधील भारतीय दुतावास आणि केंद्र सरकारने अशा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी पालकांची अपेक्षा असल्याचं तिने म्हटलं आहे.

भारत पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यानंतर किर्गिस्तानमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. देशात दररोज हिंसाचाराच्या घटना घडत असून विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय स्थानिक‌ प्रशासनाने घेतलाय.  परीक्षेनंतर जून महिन्यात किर्गिस्तानमध्ये अडकून पडलेले सर्व विद्यार्थी भारतात परतण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे भारतीय दूतावासाने किर्गिस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचंही सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

EPFO Update: पीएफ खात्यातून पैसे काढण्याची झंझट संपणार; ATM ची सुविधा कधीपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली तारीख

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Chanakya Niti: फक्त मेहनत अन् शिस्त नव्हे, यशस्वी लोकांची ही गुपितं करा फॉलो, शत्रूही होतील मित्र

SCROLL FOR NEXT