Education News : १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बातमी; परीक्षेत मिळणार नाहीत अतिरिक्त गुण, वाचा कारण

Cancellation of Extra Marks : विद्यार्थ्यांचे हे जास्तीचे मार्क पैसे घेऊन दिले जात असल्याचं समजल्यानंतर गुणांचा बाजार आता बंद झाला आहे. गुणांचा बाजार बंद झाल्याने पुढील शैक्षणिक वर्षात
10th students
Education News Saam TV

१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाती बातमी समोर आली आहे. आजवर विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणारे अतिरिक्त गुण आता रद्द करण्यात आले आहेत. कारण अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट आणि पैसे घेऊन प्रमाणपत्र मिळत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

10th students
Indian Students In America : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियात भारतीय तरुणीचा मृत्यू; मृतदेह मायदेशी आणण्यासाठी दूतावासाकडून मदत

३०० रुपयांत प्रमाणपत्र

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळांमध्ये अभ्यासातील विषयांव्यतिरिक्त विविध विषयांच्या परीक्षा आणि स्पर्धा घेतल्या जात होत्या. शाळेत येणाऱ्या या संस्था ३०० रुपयांमध्ये हे प्रमाणपत्र बनवून देत आहेत, असा आरोपही करण्यात आला होता. आरोप झाल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर आता या संस्थांची मान्यता रद्द झालीये.

कला, क्रीडा, सांस्कृतीत, लोककला अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या आणि नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून प्रमाणपत्र आणि बक्षिसे दिली जात होती. त्यासह ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांच्या कलागुणांमुळे त्यांना जास्तीचे मार्क देण्यात येत होते.

विद्यार्थ्यांचे हे जास्तीचे मार्क पैसे घेऊन दिले जात असल्याचं समजल्यानंतर गुणांचा बाजार आता बंद झाला आहे. गुणांचा बाजार बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर आणि टक्केवारीवर देखील याचा परिणाम होईल अशी शक्यता आहे. आज बारावीचा निकाला जाहीर होणार आहे. त्यानंतर याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. अशात आता या निर्णयाने विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

10th students
Student Scholarship : ४ हजार १८६ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पडून; समाज कल्याण विभागाची महाविद्यालयांना तंबी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com