CAA अंतर्गत 14 लोकांना मिळालं भारतीय नागरिकत्व, गृह मंत्रालयाने दिली माहिती

CAA Rules: एक मोठी बातमी समोर येत आहे. नागरिकत्व (सुधारित) कायदा (CAA) लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच 14 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे. या कायद्यानुसार नागरिकत्व मिळवणारे हे पहिले लोक आहेत.
CAA अंतर्गत 14 लोकांना मिळालं भारतीय नागरिकत्व, गृह मंत्रालयाने दिली माहिती
Government Hands Over First Batch Of Citizenship Certificates To 14 Under CAA RulesSaam Tv
Published On

Indian Citizenship:

एक मोठी बातमी समोर येत आहे. नागरिकत्व (सुधारित) कायदा (CAA) लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच 14 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे. या कायद्यानुसार नागरिकत्व मिळवणारे हे पहिले लोक आहेत.

गृह मंत्रालयाने बुधवारी त्यांना नागरिकत्वचं प्रमाणपत्र दिलं. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी या लोकांना नागरिकत्वाची प्रमाणपत्रे दिली आणि त्यांचे अभिनंदन केले. नागरिकत्व (सुधारित) कायदा यावर्षी 11 मार्च रोजी लागू करण्यात आला होता. या कायद्यांतर्गत जिल्हास्तरीय समितीद्वारे अर्जाचा विचार केला जातो. यानंतर हे प्रकरण राज्यस्तरीय अधिकारप्राप्त गटाकडे जाते.

CAA अंतर्गत 14 लोकांना मिळालं भारतीय नागरिकत्व, गृह मंत्रालयाने दिली माहिती
Lok Sabha Elections: इंडिया आघाडी 350 जागा जिंकणार, काँग्रेसने पहिल्यांदाच केला मोठा दावा

त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गृह मंत्रालयाकडून याबाबतचा निर्णय घेतला जातो. गेल्या दोन महिन्यांत गृह मंत्रालयाला पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील लोकांकडून अनेक अर्ज आले आहेत. या लोकांमध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समाजातील लोकांचा समावेश आहे.

धार्मिक छळाला बळी पडून हे लोक पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आले आहेत. हे सर्व लोक 31 डिसेंबर 2014 आधी भारतात आले होते. सीएएनुसार, 31 डिसेंबर 2014 पर्यंत आलेल्या लोकांचेच अर्ज नागरिकत्वासाठी विचारात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

CAA अंतर्गत 14 लोकांना मिळालं भारतीय नागरिकत्व, गृह मंत्रालयाने दिली माहिती
Mumbai Metro : PM मोदींचा मुंबईत रोड शो, मेट्रोसेवा काही वेळ राहणार बंद; आताच करा प्रवासाचे नियोजन

हा कायदा 2019 मध्येच मंजूर झाला होता. मात्र याचे नियम ठरले नव्हते. या कायद्याला देशभरातून तीव्र विरोध झाला होता. नंतर कोरोना काळात हा कायदा आणखी काही वर्षे लांबणीवर गेला. मात्र याच वर्षी याची अधिसूचना जारी झाली. हा कायदा लागू झाल्यानंतरही बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याला आव्हान देत आहेत. सीएएचा भारतीय नागरिकांच्या हक्कांवर काही परिणाम होत असेल तर मी त्याविरोधात उभी राहील, असे त्या म्हणाल्या होत्या. या कायद्यानुसार तीन शेजारील देशांतून येणाऱ्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ख्रिश्चन समुदायाच्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com