Lok Sabha Elections: इंडिया आघाडी 350 जागा जिंकणार, काँग्रेसने पहिल्यांदाच केला मोठा दावा

Congress News: लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील आणि नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार साहा यांनी केला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Saam Tv

India Alliance News:

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील आणि नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार साहा यांनी केला आहे. कोणत्याही इंडिया आघाडीच्या नेत्याची इतका मोठा दावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. साहा म्हणाले आहे की, 400 पार करण्याचा भाजपचा नारा पोकळ आहे. यावेळी इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील आणि आम्ही नवीन सरकार स्थापन करू. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत. इंडिया आघाडीला देशभरातून पाठिंबा मिळत आहे.

माध्यमांशी बोलताना साहा म्हणाले, 'भाजप चुकीची आश्वासने देऊन लोकांना मूर्ख बनवत आहे. ते आश्वासने पूर्ण करू शकलेले नाही. यावेळी त्यांना पुन्हा सत्तेत येऊ द्यायचं नाही, असा निर्धार लोकांनी केला आहे. आता इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे. 350 जागांवर विजय मिळवून इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल.

Rahul Gandhi
Anil Desai: मविआमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; प्रचार न करता माघारी फिरले अनिल देसाई

सहा यांच्या या दाव्यावर भाजपचे प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्जी म्हणाले की, यावेळी 400 पार करण्याचा नारा प्रत्यक्षात येईल. कारण आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. इंडिया आघाडीचे नेते सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत असतील तर आम्हाला काही अडचण नाही.

दरम्यान, सीपीएम आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्रिपुरामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीमध्ये एकसोबत आहेत. त्रिपुरामध्ये पूर्व त्रिपुरा आणि पश्चिम त्रिपुरा या दोन जागा आहेत.

Rahul Gandhi
PM Modi Roadshow in Ghatkopar: PM मोदींचा मुंबईत रोड शो, ड्रोन- पंतग आणि फुगे उडवण्यास बंदी

पश्चिम त्रिपुरा लोकसभा जागेसाठी आशिष साहा स्वतः रिंगणात असून त्यांची लढत राज्याचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्याशी आहे. तर पूर्व त्रिपुरामध्ये भाजप उमेदवार कृतीदेवी देब बर्मा आणि सीपीआयएमचे आमदार राजेंद्र रेआंग यांच्यात आहे. याआधी मागील वर्षी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि सीपीएम एकत्र लढले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com