Sim Card  Saam Tv
देश विदेश

Fake Mobile SIM Card: फेक सिमकार्डच्या यादीत मुंबईसह कोलकाता टॉपवर, धक्कादायक आकडेवारी आली समोर

Latest News: हा आकडा समोर आल्यानंतर दूरसंचार विभाग सतर्क झाला आहे.

Priya More

Mumbai News: फेक मोबाईल सिमकार्डच्या (Fake Mobile SIM Card) बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या फेक सिमकार्डच्या यादीमध्ये मुंबईसह कोलकाता शहर टॉपवर आहेत. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्ये देखील फेक सिकार्डच्या प्रकरणात अव्वल स्थानी आहेत. दूरसंचार विभागाच्या डिजिटल इंटेलिजन्स युनिटला (DoT) देशातील या दूरसंचार मंडळांमध्ये सर्वाधिक फेक सिम कार्ड सापडले आहेत. हा आकडा समोर आल्यानंतर दूरसंचार विभाग सतर्क झाला आहे.

पश्चिम बंगाल सर्कलमध्ये (कोलकाता, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेट) ऑगस्ट 2022 पर्यंत 6.8 लाखांहून अधिक फेक सिमकार्ड सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये 3,37,084 फेक सिमकार्ड्स सापडले असून मध्यप्रदेश फेक सिमकार्डच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गुजरातमध्ये 2,93,239 फेक सिमकार्ड्स सापडले असून ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

C-DOT सारख्या एजन्सीच्या मदतीने पुण्यातील DIU च्या डेटा वेअरहाऊसमध्ये केलेल्या AI-आधारित अभ्यासात ही सर्व धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि मुंबई हे शहर या यादीत टॉपवर आहेत. कोलकातामध्ये 1,87,881 फेक सिम कार्ड आढळले असून ते पहिल्या क्रमांकावर आहे. शहर-आधारित दूरसंचार मंडळ म्हणून या शहराने इतरांना मागे टाकले आहे. यानंतर 32,477 फेक सिमकार्डसह मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

DoT मधील सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, फेक सिमकार्ड मुख्यतः सायबर गुन्हे, फेक कॉल आणि खंडणीसाठी वापरली जाते. फेक सिमकार्ड नंबरची संपूर्ण यादी पॉइंट ऑफ सेल्सकडून (POS) आवश्यक कारवाईसाठी राज्य पोलिसांना सादर केली गेली आहे.

या बेकायदेशीर मार्गाने सिमकार्ड मिळवणारे ग्राहक पीओएस ऑपरेटरशी मिलीभगत असू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एकट्या कोलकाता सर्कलमध्ये, त्यांच्या संबंधित टेलिकॉम ऑपरेटरद्वारे 3,377 PoS विरुद्ध पोलिस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर बंगाल सर्कलमध्ये 10,915 पीओएस बुक करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार म्हणाला जय गुजरात, हा गद्दार रुकेगा नही साला - उद्धव ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT