Firefighters battle a massive blaze at a warehouse in Kolkata’s Nazirabad area. 
देश विदेश

Kolkata Nazirabad Fire: नझीराबादेतील एका गोदामाला भीषण आग; बंद गोडाऊनमध्ये अडकले मजूर, ७ जणांचा मृत्यू

Nazirabad Warehouse Fire: कोलकाता नझीराबाद परिसरातील एका गोदामात भीषण आग लागली आहे. यात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू आहे.

Bharat Jadhav

  • नझीराबाद येथील ड्राय फूड गोदामाला भीषण आग

  • आगीत ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

  • घटनेनंतर सुमारे २० जण बेपत्ता असल्याची माहिती

कोलकात्यातील नझीराबाद येथील एका गोदामाला आग लागली आहे. आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. गोदामातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार,आगी घटने घडल्यानंतर २० जण बेपत्ता आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (२६ जानेवारी २०२६) पहाटे ३ वाजताच्या सुमारास ड्राय फूडच्या गोदामाला आग लागली असून ही आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे १५ बंब काम करत आहेत.

आग काही प्रमाणात विझवल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान गॅस कटरसह इमारतीत दाखल झाले. आनंदपूरमधील नझीराबाद येथील या गोदामात प्रामुख्याने कोरडे, पॅक केलेले अन्न आणि सॉफ्ट ड्रिंक्स बाटल्या ठेवल्या होत्या. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार,एका गोदामाला लागल्याने आगीने आजूबाजुला असलेल्या इतर दोन गोदामालाही आपल्या विळख्यात घेतलं. या आगीत सर्व काही जळून खाक झाले.

आग शमवण्यासाठी आलेल्या अग्निशमन विभागाच्या दलाला अरुंद गल्लीमुळे घटनास्थळा पर्यंत पोहोचणं अवघड झालं होतं. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. कारण लांब पाईपशिवाय आगीवर पाण्याचा फवारा मारता येत नव्हतं. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात विलंब झाला. काही भागात अजूनही आगी सुरू आहेत आणि उर्वरित आगी विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री अरुप बिस्वास घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेत आणि बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. "पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. आग बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आली आहे . अग्निशमन दलाचे जवान इमारतीत दाखल झाले आहेत. आत कोणी अडकले आहे की नाही हे त्यांनी अपडेट दिल्यानंतर कळेल, अशी माहिती मंत्र्यांनी दिलीय.

दरम्यान गोदामात आग कशी लागली याचे कारण अजून समजू शकलेले नाहीये. रात्रीच्या ड्युटीवर असलेले कामगार आत अडकले होते आणि गोदामात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सहा लोकही अडकले असल्याची माहिती मिळालीय. गोदाम बाहेरून बंद होते, त्यामुळे आत असलेले लोक बाहेर येऊ शकले नाही असा आरोप स्थानिकांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकार देणार गरिबांना 2 हजार? गरिबांसाठी केंद्र सरकारची नवी योजना?

लाडक्या बहिणींना शब्द, 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगितलं

मुंबईत शिंदेसेनेची स्वतंत्र गटनोंदणी? शिंदेंना भाजपसोबत संयुक्त गटनोंदणी का नको?

WPLमध्ये घडला इतिहास; मुंबई इंडियन्सच्या फलंदाजानं ५७ चेंडूत ठोकलं शतक

अखेर भरत गोगावलेंची एक इच्छा पूर्ण, मात्र पालकमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही अपूर्ण

SCROLL FOR NEXT