कोलकाताच्या आर जी कर सरकारी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेला होऊन आता दोन वर्षे झाले असून आता एका नवीन घटनेने कोलकातामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील नीलरतन सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये 30 वर्षीय नर्सचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. ही नर्स बुधवारी रात्री ड्युटीवर होती.
मिळालेल्या महितीनुसार सदर महिला ही 8 वाजता ड्युटीवर आली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास ती हॉस्पिटलमध्ये प्रसूती विभागात असलेल्या बाथरूममध्ये गेली. बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिच्या सहकाऱ्यांनी बाथरूमचा दरवाजा वाजवला आणि तिला आवाजही देऊ लागले. मात्र कुठलाही प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी ती जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
यानंतर रुग्णालयात एकच धावपळ सुरू झाली आणि तातडीने डॉक्टर आले. तपासणीनंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एंटाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि डिटेक्टिव्ह विभागाचे पथक रुग्णालयात दाखल झाले. प्राथमिक तपासात तिच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळलेल्या नाहीत.
तसेच कोणतीही सुससाइड नोटही सापडलेली नाही. भूल देणाऱ्या ओषधाचा अतिप्रमाणात वापर झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.पश्चिम बंगालचे आरोग्यमंत्री शरदवत मुखर्जी यांनी गुरुवारी सकाळी रुग्णालायाल भेट देत बुधवारी रात्री ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.