Mahua Moitra Case Saam Digital
देश विदेश

Who is Mahua Moitra: कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडकलेल्या महुआ मोईत्रा कोण आहेत? वाचा सविस्तर

Who is Mahua Moitra: मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या खासदार होत्या. कॅश फॉर क्वेरीप्रकरणी त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. पण या महुआ मोईत्रा आहेत तरी कोण? त्या राजकारणात कशा आल्या?

Vishal Gangurde

तुषार ओव्हळ, मुंबई

Mahua Moitra latest News:

तृणमूल काँग्रेसच्या मलुख मैदान, संसदेतल्या तोफ अशी महुआ मोईत्रा यांची ओळख आहे. मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या खासदार होत्या. कॅश फॉर क्वेरीप्रकरणी त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. पण या महुआ मोईत्रा आहेत तरी कोण? त्या राजकारणात कशा आल्या? राजकारणात येण्यापूर्वी त्या काय करत होत्या? काय आहे त्यांची राजकीय कारकीर्द? जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

नोकरी सोडून राजकारणात एन्ट्री

१९७४ साली एका बंगाली कुटुंबात मोईत्रा यांचा जन्म झाला. आसाममध्ये जन्मलेल्या मोईत्रा यांचं शिक्षण कोलकात्यात झालं. १९९८ साली अमेरिकेत अर्थशास्त्र आणि गणित विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. अमेरिकेत जे.पी.मॉर्गन कंपनीत त्यांनी काही वेळ कामही केलं. नंतर जेपी मॉर्गन कंपनीत मोठी नोकरी सोडून २००९ साली त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली.

सुरुवातीला मोईत्रा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. आम आदमी का सिपाही या काँग्रेसच्या कॅम्पेनमध्ये राहुल गांधीसोबत त्यांनी काम केलं.२०१० साली मोईत्रांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. २०१६ साली त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्या आमदार झाल्या.

२०१९ साली काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार झाल्या. जून २०१९ साली संसदेत त्यांनी फॅसिझमवर जोरदार भाषण केलं होतं. त्यामुळे मोईत्रा चर्चेत आल्या होत्या.

२०२२ साली एका कार्यक्रमात त्यांनी कालीमातेवर विधान केलं होतं. त्यामुळेही वाद झाला होता. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सुप्रीम कोर्टाचे वकील जय देहद्रायी यांनी मोईत्रांवर कॅश फॉर क्वेरीचा आरोप केला.

मोईत्रांनी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतले आणि संसदेस अदानींविरोधात प्रश्न उपस्थित केला. असा आरोप देहद्रायी यांनी केला. ऑक्टोबरमध्ये आपण हिरानंदानी यांना प्रश्न टाईप करण्यासाठी संसदेचे लॉगईन आयडी आणि पासवर्ड दिल्याचं मोईत्रा यांनी मान्य केलं.

हिरानंदानी यांनी आपल्याला स्कार्फ, लिपस्टिक आणि इतर वस्तू गिफ्ट दिल्या पण त्या वैयक्तिक मित्र म्हणून असं स्पष्टीकरण मोईत्रांनी दिलं. मोईत्रा यांचं सदस्यत्व निलंबित करावं असं ९ नोव्हेंबरला संसदीय समितीने सुचवलं. ८ डिसेंबरला संसदेने त्यांची खासदारकी रद्द केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुठलाही पुरावा नसताना आपली खासदारकी रद्द केली असा आरोप मोईत्रांनी केला आहे. पुढेही आपण अदानीविरोधात आवाज उठवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT