Expressway accident Death Toll साम टीव्ही मराठी
देश विदेश

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Expressway accident Death Toll : हरियाणातील KMP एक्सप्रेसवेवर पिकअपने उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला तर १४ जण गंभीर जखमी झाले.

Namdeo Kumbhar

KMP Expressway accident 6 devotees killed : हरियाणातील कुंडली-मानेसर-पालवल (KMP) एक्सप्रेसवेवर मंगळवारी पहाटे पिकअपचा भीषण अपघात झाला. राजस्थानमधील खाटू श्याम आणि सालासर बालाजीचे दर्शन घेऊन मथुरा-वृंदावनकडे जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीने ट्रकला मागून जोरदार धडक मारली. या अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. विजय सिंग, राजकुमार, रेश्मा देवी, कमला देवी, सुधा आणि महेश अशी मृतांची नावे आहेत.

ट्रकला लागलेली ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. तर १४ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत व जखमी हे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. अपघातानंतर जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मंगळवारी पहाटे ५:३० च्या सुमारास भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला. भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात सहा यात्रेकरूंचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना पलवल येथील जिल्हा नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात

पिकअप चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याचे जखमी भाविकाने सांगितले. एका भाविकाने सांगितले की, मंगळवारी पहाटे केएमपी द्रुतगती मार्गावरून जात असताना चालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे पिकअप अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअपचा चेंदामेंदा झाला.

अपघातानंतर रस्त्यावरून जाणारे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. पोलीस आणि स्थानिक लोकांनी पिकअपमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व यात्रेकरू उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याचे रहिवासी होते. ते शुक्रवारी धार्मिक यात्रेला निघाले होते. सोमवारी संध्याकाळी राजस्थानमधील खाटू श्याम आणि सालासर बालाजी मंदिरांना भेट दिल्यानंतर ते मथुरा-वृंदावनकडे निघाले होते. पण मंगळवारी पहाटे त्यांची वाहनाचा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

गवतावर चालल्याने रक्तदाब सुधारतो का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT