Union Minister Kiren Rijiju shares video alleging misconduct by Congress MPs during the Lok Sabha Budget Session. Saam Tv
देश विदेश

लोकसभेत राडा! काँग्रेसचे खासदार लोकसभाध्यक्षांच्या दालनात घुसले, शिवीगाळ केल्याचा आरोप; भाजपच्या मंत्र्याने व्हिडीओ केला शेअर

Kiren Rijiju Allegations Against Congress MPs: लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला असून काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या दालनात घुसून गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे.

Omkar Sonawane

देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून लोकसभेत मागच्या काही दिवसांपासून जोरदार गदारोळ सुरू आहे. अशातच आज केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसच्या खासदारांवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसचे 20 ते 25 खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांना शिवीगाळ केली. तसेच या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली, असे रिजिजू यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे.

लोकसभेत काही दिवसआधीच किरेन रिजीजू यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तराचे भाषण होणार होते. पण, काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ गेल्याने गोंधळ झाला होता. किरेन रिजिजू यांनी गुरुवारी 12 फेब्रुवारी आज नवीन व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून टाकली आहे. 20 ते 25 कॉँग्रेसचे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात गेले आणि त्यांना शिवीगाळ केली. तसेच बेकायदेशीरपणे हा व्हिडिओ बनवला आहे.

रिजिजू म्हणाले, प्रियंका गांधी, के.सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात उपस्थित होते. प्रियंका गांधी खासदारांना भांडण करणण्यासाठी उकसवत होते. लोकसभा अध्यक्ष ही खूप भोळे आणि शांत आहेत. नाहीतर खूप मोठी कारवाई झाली असती असा आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Fort : मालवणच्या समुद्रात दिमाखात उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला, 'ही' रहस्ये वाचून व्हाल अवाक्

उपवासाला नाश्त्याला बनवा कुरकुरीत रताळे, फक्त १० मिनिटांत तयार होईल झटपट रेसिपी

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील आरोपीला जामीन

भाजपमध्ये मोठा फेरबदल; अमित मालवीय यांना IT सेलच्या प्रमुख पदावरून हटवल; केमिस्ट्री प्रोफेसरकडे नेतृत्व

Chandra Grahan Horoscope: चंद्रग्रहणानंतर नशीब बदलणार! ‘या’ 3 राशींवर धनवर्षाव अन् करिअरमध्ये प्रगती होणार; जाणून घ्या कोणत्या?

SCROLL FOR NEXT