Rajasthan Khatu Shyam temple devotees pickup accident  
देश विदेश

Accident : भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भयंकर अपघात, १० जणांचा मृत्यू, ७ मुलांचा समावेश

Rajasthan pickup accident : खाटू श्याम मंदिरातून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपला अपघात झाला. अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून त्यात ७ मुलांचा समावेश आहे.

Namdeo Kumbhar

  • राजस्थानमध्ये भाविकांच्या पिकअपचा भीषण अपघात.

  • १० जणांचा मृत्यू, त्यात ७ चिमुकल्यांचा समावेश.

  • जखमींना जयपूरसह स्थानिक रुग्णालयात दाखल.

  • पिकअपने उभ्या ट्रकला दिली जोरदार धडक.

Rajasthan Khatu Shyam temple devotees pickup accident : राजस्थानमध्ये भाविकांच्या पिकअपचा भयंकर अपघात झालाय. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतामध्ये सात मुलांचा समावेश आहे. खाटू श्याम मंदिरात दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना भाविकांच्या पिकवर काळाने घातला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी रूग्णांना जयपूर रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Rajasthan Khatu Shyam temple devotees pickup accident)

मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली पिकअप खाटू श्यामचे दर्शन घेऊन घराकडे परत येत होती. त्यावेळी पिकअपचा अपघात झाला. दुर्घटनेत सात मुलांचा आणि तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही भाविकांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे, त्यांना उपचारासाठी जयपूरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्‍यांनी अपघाताबाबत दुख व्यक्त केले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी अपघातग्रस्त पिकअप खाटू श्याम मंदिराकडून येत होता. त्यावेळी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या मालवाहू ट्रकला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती, की पिकअपचा जागेवरच चक्काचूर झाला. ७ चिमुकल्यांसह १० जणांचा जागेवरच मृत्यू झाला. स्थानिकांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

या अपघाताची माहिती देताना एसपी सागर राणा यांनी सांगितले की, खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताची माहिती मिळाली होती. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या अपघातात जखमी झालेल्या सुमारे 7-8 जणांना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT