Who is Nimisha Priya 
देश विदेश

Who is Nimisha Priya: येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेली भारतीय नर्स नेमकी आहे तरी कोण? तिच्या हातून कोणता गुन्हा घडला होता?

Who is Nimisha Priya : येमेनमध्ये स्वतःचे क्लिनिक उघडण्याचे स्वप्न पाहणारी निमिषा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनवण्यात आलीय.

Bharat Jadhav

येमेनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय नर्सला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. आता येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल-अलिमी यांनीही नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा मंजूर केलीय. तिला फाशीची शिक्षा होऊ नये यासाठी तिच्या कुटुंबियांनी सर्व प्रयत्न केले, परंतु ते तिला फाशीच्या शिक्षेपासून वाचवू शकले नाहीत. इतकेच नाही तर ब्लड मनीवर सहमती झाली नाही आणि राष्ट्रपतीनेही तिला माफी दिली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार नर्स निमिषा प्रियावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यात ती दोषी आढळली असून तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.

निमिषा एका येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी दोषी आहे आणि २०१७ पासून ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिला एका महिन्यात फाशीची शिक्षा देण्यात येईल. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती आहे. येमेनमध्ये निमिषा प्रिया हिला फाशीची शिक्षा देण्यात आलीय याची माहिती भारताला आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक निवेदन जारी करत सांगितलं की, "आम्हाला माहित आहे नर्स प्रियाचे कुटुंब पर्याय शोधत आहे.

तसेच भारत सरकार याप्रकरणी त्यांची सर्वप्रकारची मदत करत आहे. येमेनच्या राष्ट्रपतींचा निर्णय हा कुटुंबासाठी एक धक्का आहे. निमिषाचे कुटुंबिय ३६ वर्षीय मुलीला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. नर्स प्रियाची ५७ वर्षीय आई प्रेमा कुमारी या वर्षाच्या सुरुवातीला येमेनची राजधानी साना येथे पोहोचली होती. तेव्हा त्यांनी तेथे त्यांनी मुलीला मिळालेल्या शिक्षेतून सुटका व्हावी. तसेच पीडित कुटुंबासोबत त्यांनी ब्लड मनीवर सुद्धा चर्चा केली. पण त्याचा काही फायदा झाला नाही.

काय आहे आरोप

नर्स निमिषा प्रियाला वर्ष २०१७ मध्ये यमनचा नागरीक तलाल अब्दो महदीच्या हत्येत दोषी घोषित करण्यात आलं. त्यानंतर एक वर्षानंतर सुनावणी सुरू असताना ट्रायल कोर्टाने तिला मृत्यूची शिक्षा सुनावली. तेव्हापासून निमिषाचे कुटुंबीय तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात तिच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. परंतु वर्ष २०२३ मध्ये त्यांची याचिका फेटाळण्यात आली. इतकेच नाहीतर यमनच्या राष्ट्रपतींनीही त्यांची याचिका फेटाळून लावलीय. नर्स निमिषाची सुटका ही पीडित परिवार आणि त्यांच्या आदिवासी नेत्यांच्या माफीवर अवलंबून होती.

ब्लड मनीवर नाही झाली सहमती

निमिषा प्रियाची आई प्रेमा कुमारी यांनी पीडित कुटुंबाशी ब्लड मनीवर सतत बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मनोरमा ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, परंतु भारतीय दूतावासाने नियुक्त केलेल्या अब्दुल्ला अमीर या वकिलाने 20,000 डॉलर (सुमारे 16.6 लाख रुपये) प्री-नेगोशिएशन फीची मागणी केल्यानंतर सप्टेंबरमध्ये पीडितेच्या कुटुंबाशी बोलणी अचानक ठप्प झाली. परराष्ट्र मंत्रालयाने जुलै महिन्यात वकील अमीरला 19,871 डॉलर्स दिले होते.

पण तो $40,000 डॉलर एकूण फीची मागणीवर ठाम होता, ते पैसे पुन्हा बोलणी सुरू करण्यापूर्वी दोन हप्त्यांमध्ये भरायचे होते. वकील अमीरच्या फीचा पहिला हप्ता द सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिल क्राउडफंडिंगद्वारे गोळा करण्यात आला. पण नंतर निधी देणाऱ्यांसमोर पारदर्शकतेशी संबंधित आव्हाने उभी राहिली.

कोण आहे निमिषा प्रिया?

निमिषा प्रिया केरळमधील पलक्कड येथील रहिवासी आहे. ती व्यवसायाने नर्स आहे. तिने काही वर्षे येमेनमधील खासगी रुग्णालयात काम केले. आर्थिक कारणांमुळे तिचा नवरा आणि अल्पवयीन मुलगी २०१४ मध्ये भारतात परतले. त्याचवर्षी, येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झाले. त्यामुळे नवीन व्हिसा जारी करणे थांबण्यात आले होते. ते दोघेही निमिषाला परत येऊ शकले नाहीत.

त्यानंतर निमिषा प्रियाने 2015 तिने तिचा पार्टनर तलाल अब्दो महदी यांच्याकडे स्वतःचे क्लिनिक सुरू करण्यासाठी मदत मागितली होती. कारण यमनच्या कायद्यानुसार, तेथे फक्त तेथील नागरिकांना क्लिनिक आणि व्यासायिक फर्म सुरू करण्याची परवानगी आहे. निमिषाने ज्याच्याकडून मदत मागितील त्या तलाल अब्दो महदी यांच्यासोबत वाद झाला.

तर निमिषाच्या कुटुंबियांनी याप्रकरणी सांगितलं की, अब्दोने निधीमध्ये हेरफार केली होती. तर निमिषाने त्याला विरोध केला होता. एका वृत्तानुसार, अब्दोने निमिषाचा पासपोर्ट जप्त केला होता. तसेच तिच्या लग्नाचा फोटोसुद्धा चोरला होता. त्याने फोटो मार्फकरून प्रियासोबत आपण लग्न केलं असल्याचा दावा तो करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT