Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Kerala Next CM: केरळचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? काँग्रेसच्या 'या' ३ नेत्यांची नावं चर्चेत

Kerala Assembly Election Result: केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. काँग्रेसचा विजय झाल्यानंतर केरळचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत काँग्रेसमधून ३ जणांची नावं चर्चेत आहेत.

Priya More

Summary -

  • केरळमध्ये यूडीएफची स्पष्ट आघाडी

  • काँग्रेसकडून ३ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार चर्चेत

  • एलडीएफला अपयश मिळताना दिसत आहे

  • काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढण्याची शक्यता

केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होईल. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतमोजणी सुरू असून आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ पक्षाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. १४० विधानसभा विधानसभा जागांपैकी १०० जागांवर यूडीएफ आघाडीवर आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी असलेल्या एलडीएफ पक्षाला फक्त ४० जागांवर आघाडी मिळाली आहे. जर केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी जिंकली तर मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल. काँग्रेसकडून ३ नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

केरळमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये ३ प्रमुख नावं आघाडीवर आहेत. पहिले नाव व्ही.डी. सतीश, दुसरे नाव रमेश चेन्नीथला आणि तिसरे नाव के.सी. वेणुगोपाल यांचे आहे. हे तिघेही मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे सांगत आहेत. काँग्रेस पक्षात देखील त्यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी ही निवडणूक लढवली नाही. हरिपाद मतदारसंघात रमेश चेन्नीथला ७,००० हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. तर परवूर मतदारसंघात व्ही. डी. सतीश यांनी सुमारे १,००० मतांची आघाडी घेतली आहे.

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षात अंतर्गत लढाई ही राज्य नेत्यांपूरती मर्यादित होती. पण आता के.सी. वेणुगोपाल यांच्यासारख्या हायकमांडमधील एका प्रमुख नेत्याच्या प्रवेशाने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. वेणुगोपाल हे काँग्रेसचे सरचिटणीस असून ते राहुल गांधींच्या अतिशय जवळचे मानले जातात. पूर्वी जेव्हा केंद्रात काँग्रेस सत्तेत होती तेव्हा अशा परिस्थिती हाताळणे सोपे होते. पक्षाचे हायकमांड ज्येष्ठ नेत्यांना केंद्र सरकारमध्ये महत्वाची पदं देऊन मनधरणी करायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

SCROLL FOR NEXT