Wayanad Landslides Saam Tv
देश विदेश

Wayanad Landslides: वायनाडमध्ये मृत्यूतांडव! मृतांचा आकडा ३५७ वर, २०६ जण अजूनही बेपत्ता; नातेवाईकांचा आक्रोश

Wayanad Landslide Update Death Toll Rises: वायनाड भूस्खलनाच्या घटनेला ६ दिवस झाले. सहाव्या दिवशी शोधकार्य सुरू आहे. केरळमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Priya More

केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, लष्कराचे जवान, स्थानिक प्रशासन यांच्याकडून यांच्याकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सापडलेल्या सर्व मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. यामधील २१८ मृतांची ओळख पटली आहे. तर १४३ जणांच्या मृतदेहाचे फक्त तुकडे मिळाले आहेत. तर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या ५१८ जणांपैकी २०९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सतत पडणारा पाऊस आणि चिखल यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

वायनाड भूस्खलनाच्या घटनेला ६ दिवस झाले. सहाव्या दिवशी शोधकार्य सुरू आहे. केरळमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली की, त्यांचे सरकार वायनाडमध्ये भूस्खलनग्रस्तांसाठी १०० घरे बांधणार आहे. राज्य सरकार आणि इतर पथकांसह पीडितांना मदत केली जात आहे.

मुख्यमंत्री विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये शोध आणि बचाव कार्य शेवटच्या टप्प्यात आहे. परंतू अद्याप २०६ जण बेपत्ता आहेत. लष्कराचे जवान, एनडीआरएफची टीम , वन विभागाचे कर्मचारी, पोलिस, निमलष्करी दल आणि स्वयंसेवकांसह १४०० हून अधिक जण मदतकार्यात गुंतले आहेत. लष्कराने १ ऑगस्ट रोजी मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावात बचाव कार्य संपल्याची माहिती दिली होती. आता केवळ ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी ढिगाऱ्याखाली २० ते ३० फूट खाली मृतदेह दबले गेल्याची शक्यता आहे. पाऊस आणि चिखलामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान, केरळच्या वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये २९ जुलै रोजी चार गावांमध्ये भूस्खलन झाले होते. या भूस्खलनामध्ये भूस्खलनामध्ये मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा ही चार गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. ही सर्व गावं जमिनदोस्त झाली. या गावातील सर्व घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांची संपूर्ण कुटुंब या भूस्खलनात बेपत्ता झाले. या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे नातेवाईक त्यांना शोधण्यासाठी घटनास्थळी बसून आहेत. ते देखील या मदत आणि बचावकार्यामध्ये मदत करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT