PM Narendra Modi Saam TV
देश विदेश

BJP: महिलांना दरमहा ₹२५०० अन् गरीब कुटुंबाला २ सिलिंडर फ्री देणार, भाजपकडून मोठी घोषणा

BJP Kerala manifesto 2026: भाजपने केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी भाजपने केरळमधील गरजू महिलांना दरमहा २५०० रुपये आणि गरीब कुटुंबाला वर्षाला २ सिलिंडर मोफत देणार असल्याची घोषणा केली.

Priya More

Summary -

  • महिलांना २५०० रुपये मासिक मदतीची घोषणा

  • गरीब कुटुंबांना २ मोफत गॅस सिलिंडर

  • केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

  • केरळला एम्स आणि हाय-स्पीड रेल्वे देण्याची देखील घोषणा

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. भाजपने गरजू महिलांना औषधं आणि किराणा मालासाठी २५०० रुपये मासिक रिचार्जसह भक्ष्य आरोग्य सुरक्षा कार्ड देण्याची घोषणा केली. तसंच गरीब कुटुंबाला वर्षाला २ सिलिंडर मोफत दिले जाणार आहे. भाजपचा जाहीरनामा पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी प्रसिद्ध केला. केरळमध्ये येत्या ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर २ मे रोजी निकाल लागणार आहे.

भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये केरळमध्ये एम्सची स्थापन करण्यात येणार असल्याचा उल्लेख देखईल करण्यात आला आहे. तसंच तिरूवनंतपुरम ते कन्नूरला जोडणाऱ्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचाही समावेश असणार आहे. गरीब कुटुंबाला वर्षाला २ मोफत एलपीजी सिलिंडर दिले जाामर आहेत. यापैकी एक सिलिंडर ओणमच्या वेळी आणि दुसरा ख्रिस्मसच्या वेळी दिला जाणार आहे. शबरीमला आणि गुरूवायूर यासारख्या प्रार्थनास्थळांच्या संरक्षणासाठी देवस्वम मंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे अश्वासन भाजपकडून देण्यात आले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी मार्क्सवादी कम्युनिस्टी पार्टी आणि काँग्रेसवर मॅच फिक्सिंग करत केरळच्या जनतेसोबत खेळ खेळत असल्याचा आरोप केला. जनतेला आता बदल हवा आहे. त्यांना भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख सरकार पाहिजे आहे आणि ते फक्त भाजपच देऊ शकते, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. नवीन यांनी यावेळी केरळच्या जनतेला ९ एप्रिल रोजी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की, केरळमधील विधानसभा निवडणुका सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीने (एलडीएफ) जिंकाव्यात अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे. त्यांनी सांगितले की, 'काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) ही एलडीएफ आणि भाजपच्या संयुक्त शक्तीशी लढत आहे. ही निवडणूक दोन विचारप्रणालींमधील लढाई आहे. ही लढाई सीपीआयच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी आणि यूडीएफ यांच्यात आहे. पहिल्यांदाच आपण भाजप आणि डाव्या आघाडीशी भागीदारी पाहत आहोत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT