Kerala Crime Saam Tv
देश विदेश

Crime: गे डेटिंग अ‍ॅपवर ओळख, अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, बड्या राजकीय नेत्यासह १४ जणांवर गुन्हा

Kerala Crime: केरळमध्ये भयंकर घटना समोर आली. गे डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाल्यानंतर एका अल्पवयीन मुलाचे १४ जणांनी लैंगिक शोषण केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजकीय नेता आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

Priya More

केरळमध्ये भयंकर घटना घडली. १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गे डेटिंग अ‍ॅपवर या सर्वांची ओळख झाली होती. या प्रकरणात ज्या लोकांची नावं समोर आली आहेत त्यामध्ये राजकीय नेता, दोन सरकारी कर्मचारी आणि एक फुटबॉल प्रशिक्षकाचा देखील समावेश आहे. हे सर्वजण गे डेटिंग अ‍ॅपद्वारे या अल्पवयीन मुलाला भेटत होते.

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगा दहावीमध्ये शिकतो. दोन वर्षांपासून तो गे डेटिंग अ‍ॅपवर आहे. यादरम्यान कासरगोड, कन्नूर, कोझिकोड आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील १४ जणांनी त्याचे लैंगिक शोषण केले. हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा या मुलाच्या आईला त्याच्यावर संशय आला. या मुलाच्या आईने एक दिवस त्यांच्या घरातून एका व्यक्तीला पळून जाताना पाहिले. जेव्हा तिने आपल्या मुलाची विचारपूस केली तेव्हा त्याने आईला सर्वकाही सांगितले. त्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलाच्या आईने चाइल्ड हेल्पलाइनवर संपर्क करत घटनेची माहिती दिली आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी पीडित मुलाच्या जबाबानंतर १४ जणंविरोधात गुन्हा दाखल केले. पोक्सो कायद्याअंतर्गत या सर्वांविरोधात कारवाई करण्यात आली. यामधील ८ प्रकरणांचा तपास कासरगोड पोलिस करत आहेत. तर बाकीच्या ६ प्रकरणाचा तपास कोझिकोड आणि कन्नूर पोलिस करत आहेत. या घटनेमुळे केरळमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिस सध्या त्या डेटिंग अ‍ॅपचाही तपास करत आहेत. अ‍ॅपमध्ये काही त्रुटी होत्या का? ज्यामुळे अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण झाले याचा तपास केला जात आहे. तसंच युजर्सच्या वय पडताळणीसाठी पुरेशा व्यवस्था होत्या का? याचा देखील तपास केला जात आहे. हे प्रकरण फक्त एका अल्पवयीन मुलाशी संबंधित नाही तर या डिजिटल जगामध्ये आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी पालकांना सतर्क देखील करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT