KERALA BJP FACES BIG BLOW: S. DEVAN RESIGNS AS VICE PRESIDENT AND QUITS PARTY saam tv
देश विदेश

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

Kerala BJP Vice President Resigns : अभिनेते आणि नेते एस. देवन यांनी केरळ भाजपच्या उपाध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला. कनाचिकुलंगरा देवी मंदिरातील कार्यक्रमात भाषण संपवताना त्यांनी ही घोषणा केली.

Bharat Jadhav

  • एस. देवन यांनी केरळ भाजपच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला

  • अभिनेते एस. देवन यांचा भाजपला रामराम

  • केरळ भाजपला मोठा धक्का एस. देवन यांचा राजीनामा

केरळमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. रविवारी 'कनाचिकुलंगरा देवी' मंदिरात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, अभिनेते एस. देवन यांनी केरळ भाजपच्या उपाध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला. मंदिरातील कार्यक्रमात आपले भाषण संपवताना त्यांनी ही घोषणा केली.

मंचावरून राजीनाम्याची घोषणा

या कार्यक्रमाला 'श्री नारायण धर्म परिपालन योगम'चे सरचिटणीस वेल्लापल्ली नटेसन आणि भाजप नेते बी. राधाकृष्ण मेनन हे देखील उपस्थित होते. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देताना देवन म्हणाले, "मी ज्या राजकारणावर विश्वास ठेवतो, ते श्री नारायण गुरूंचे आदर्श, तत्त्वे आणि कार्यक्रम यांवर आधारित आहे. केरळमध्ये भाजपमध्ये सामील झाल्यानंतर, गेल्या पाच वर्षांत मला त्या मार्गाचे अनुसरण करणे शक्य झाले नाही, याची जाणीव मला झाली."

माझा राजकीय दृष्टिकोन वेगळा आहे , असे मला वाटले. त्याबाबत माझी पक्की खात्री पटली. मी माझा राजीनामा लिहिला असून, उपाध्यक्षपदावरून पायउतार होत आहे तसेच भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडत आहे.

२००४ आणि २००६ च्या निवडणुकांमध्ये पराभव

सभेला संबोधित करताना देवन यांनी नमूद केले की, त्यांनी २००४ आणि २००६ मध्ये निवडणुका लढवल्या होत्या, परंतु दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ते म्हणाले, "येथे बसल्यानंतरच मी याच मंचावरून ही घोषणा करण्याचा निर्णय घेतला." आपले म्हणणे संपवताना देवन यांनी सांगितले, "मी भाजपच्या उपाध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणारे पत्र लिहिले आहे."

भाजपची नाराजी

देवन यांच्या राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी मंदिरातील कार्यक्रमाची निवड केल्याबद्दल भाजप नेते बी. राधाकृष्ण मेनन यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "२०४७ पर्यंत भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर नेण्याच्या भाजपच्या प्रयत्नांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय देवन यांनी का घेतला, हे मला माहित नाही. तरीही, त्यांनी असा निर्णय का घेतला हे स्पष्ट करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या, चिमण्यांनो! मुलींची माफी मागत ASI पोलीस अधिकाऱ्यानं जीवन संपवलं; लॉजमध्ये आढळला मृतदेह, नवी मुंबई पोलीस दलात खळबळ

Healthy Kidneys : किडनी निरोगी ठेवायची असेल तर रोज खा हे 7 पदार्थ

एकाच स्कुटीवर 5 जण, पोलिसांची नजर पडली! हुल्लडबाज चालक थेट पोलिसांच्या जाळ्यात

Vidyanand Bapat: DJनंतर आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांकडे मोर्चा; विद्यानंद बापटांचा इशारा

शेअर मार्केटच्या नुकसानीने डोकं फिरलं; चोरीसाठी घरात घुसला अन् 61 वर्षीय वृद्धासोबत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT