Nashik Firing: नाशिकमध्ये गोळीबाराने खळबळ! पानटपरीसमोर उभ्या असलेल्या तरुणावर फायरिंग

Nashik Gunfire Crime: नाशिक रोडच्या गोसावी वाडी चौफुलीवर पानटपरीसमोर उभ्या असलेल्या ३२ वर्षीय सुमित पगारे याच्यावर अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. पोटात गोळ्या लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nashik Gunfire Crime
NASHIK SHOOTING: 32-YEAR-OLD YOUTH SHOT TWICE OUTSIDE PAN SHOPsaam tv
Published On
Summary
  • 32 वर्षीय तरुणावर नाशिकरोडमध्ये दोन गोळ्या

  • गोसावी वाडी चौफुलीवर तरुणावर गोळीबार

  • नाशिकरोड पानटपरीसमोर गोळीबाराची घटना

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

नाशिक शहर रात्र झालेल्या गोळीबारामुळे हादरलंय. शहरातील नाशिक रोड भागातील गोसावी वाडी चौफुलीवर असलेल्या पानटपरीसमोर गोळीबाराची घटना झालीय. पानटपरीसमोर उभ्या असलेल्या 32 वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाला असून तरुण गंभीररित्या जखमी झालाय.

Nashik Gunfire Crime
गर्लफ्रेंड बेस्ट फ्रेंडसोबत निघाली, उद्योगपतीनं कारच्या बोनेटवर उडी मारली; पुढच्याच क्षणी भंयकर घडलं अन् जागेवरच मृत्यू

सुमित पगारे असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुमितला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाती आलेल्या महितीनुसार, सुमित पगारे हा गोसावी वाडी चौफुलीवरील एका पानटपरीसमोर उभा होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. सुमितच्या पोटात या दोन्ही गोळ्या घुसल्या असून तो गंभीररित्या जमखी झालाय.

Nashik Gunfire Crime
Crime: झोप मोड झाल्याने तरुणाची सटकली, घरात बोलावून ४ मुलींवर कोयत्याने सपासप वार; तिघींचा जागीच मृत्यू

गोळीबार घडल्याची माहिती मिळताच शहरातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत हल्लेखोर आणि गोळीबारामागील कारणाचा शोध घेतला जातोय. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जुन्या वादातून गोळीबार झाला असावा. गोळीबाराच्या घटनेने गोसावीवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com