केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफचा विजय
पंतप्रधान मोदींनी विजयामागील कारण स्पष्ट केले
दक्षिण भारताच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागला. यात पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजपची एकहाती सत्ता मिळवली. तर पुदुच्चेरीमध्ये भाजप प्रणित एनडीएचं सरकार सत्तेत आले आहे. दुसरीकडे तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्यांदा विधानसभा लढवताना सत्ता स्थापन केली. तर केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफचा विजय झाला. मात्र केरळमध्ये काँग्रेसचा विजय कसा झाला याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
केरळमध्ये काँग्रेसच्या कर्तृत्वापेक्षा डाव्या आघाडीनं (LDF) दहा वर्षांत अधिक खराब कारभार केला. त्यांच्या खराब कारभारामुळे काँग्रेसला विजय मिळाला आहे. पाच राज्यांमधील मतमोजणीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या संबोधनात महिला मतदारांचा उल्लेख केला. देशातील बहिणी काँग्रेसला धडा शिकवतील असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान 10 वर्षांच्या काळात केरळमध्ये डाव्यांनी कुशासन केलं. त्याचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. एलडीएफच्या कारभाराला त्रासलेल्या जनतेने पर्यायी सरकारचा विचार केला. परंतु केरळमधील माझ्या माता-भगिनी येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला नक्कीच धडा शिकवतील', असं वक्तव्य मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलं.
2026 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) ने सत्ताधारी एलडीएफला (LDF) धूळ चारली. केरळच्या मतदारांनी दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची आपली जुनी परंपरा कायम राखली आहे. 140 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेस प्रणीत युडीएफने बहुमताचा आकडा सहज पार केला.
अँटी-इन्कम्बन्सी : मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सलग दोन टर्म सत्तेत होती. जनतेमध्ये प्रस्थापित सरकारविरुद्ध नाराजी होती.
काँग्रेसची एकजूट : प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ही निवडणूक नियोजनबद्ध पद्धतीने लढवली. राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेचा प्रभाव दिसून आला. वायनाडशी असलेले त्यांचे नात्याने या विजयात महत्त्व भूमिका बजावली.
मलबारमधील बालेकिल्ला : मुस्लिम लीगने (IUML) मलबार भागात काँग्रेसच्या बाजूने मतं दिली. मलबारमधील जवळपास सर्वच जागा युडीएफच्या पारड्यात पडल्या.
भाजपचा फॅक्टर : अनेक मतदारसंघांमध्ये त्रिकोणी लढत झाली, याचा फायदा काँग्रेसला झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.