DK Shivkumar
DK Shivkumar  Saamtv
देश विदेश

DK Shivkumar: एक दिवस प्रचार अन् 1 लाखांनी विजय! पंतप्रधानांचाही पराभव; कोण आहेत जायंट किलर DK शिवकुमार?

Gangappa Pujari

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे. भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पूर्ण केला आहे. काँग्रेसने उद्या तातडीने पक्षातील आमदारांची बैठकही बोलवली आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Dk शिवकुमार यांचे नाव आघाडीवर आहे. जाणून घेवूया कॉंग्रेससाठी संकटमोचकची भूमिका साकारणारे जायंट किलर अशी ओळख असलेले डी के शिवकुमार यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल...

कोण आहेत DK शिवकुमार...

डीके शिवकुमार (DK Shivkumar) हे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष असून ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. कॉंग्रेसच्या विजयात त्यांचा सर्वात मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. ते कनकापुरा मतदारसंघातून 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. (Latest Marathi News)

१ लाख मतांनी विजय...

या निवडणूकीत ते भाजपचे वरिष्ठ नेता आणि कर्नाटकचे मंत्री आर. अशोक यांच्याविरोधात कनकपुरा येथून उभे राहिले होते. निवडणूकीत डीके शिवकुमार यांनी भाजपच्या नेत्याला तब्बल 1 लाख मतांच्या फरकाने हरवलं आहे. त्यामुळे डीके पुन्हा एकदा जायंट किलर म्हणून समोर आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी फक्त शेवटच्या दिवशीच मतदार संघात प्रचार केला होता.

सर्वात श्रीमंत आमदार..

डीके शिवकुमार हे कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती 1,413 कोटी रुपये आहे. 2013 मध्ये ते जेडी (s) PGR सिधिंयांना हरवून 30,000 हून अधिक मतांनी निवडून आले होते.

पंतप्रधानांचाही केला पराभव...

केवळ सिधिंयाच नाही तर शिवकुमार यांनी जद (s) सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि त्यांचा मुलगा एच डी कुमारस्वानी यांना बंगळुरू ग्रामीणमधून हरवलं आहे. या यशानंतर त्यांना जाइंट किलर नावाने ओळख मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident News: लोणीकंद-थेऊर अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; तिघे मृत्यूमुखी, एकाची मृत्यूशी झुंज

Today's Marathi News Live : हर्सूल सावंगी रस्त्यावर अपघात, एक महिला जागीच ठार

Mahayuti News: नाशिकची जागा शिवसेनेलाच? महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची बातमी, आज मोठी घोषणा होणार?

Ravindra Waikar News : मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकरांना उमेदवारी?

Mens Fashion Tips: मुलांनो पार्टीत सुदंर दिसायचय ? या टीप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT