Viral Video : कर्नाटकच्या विजयाचा जल्लोष पडला महागात, फटाके फोडताना काँग्रेस नेते थोडक्यात बचावले, VIDEO

कर्नाटकच्या विजयाचा जल्लोष पडला महागात, फटाके फोडताना काँग्रेस नेते थोडक्यात बचावले, VIDEO
Congress Delhi Office Celebration
Congress Delhi Office CelebrationSaam TV

Congress Viral Video : कर्नाटकात निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसला मोठं बहुमत मिळताना दिसत आहे. अशातच काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयात मोठा उत्साह साजरा केला जात आहे. सकाळपासूनच कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने जमले असून ढोलताशे वाजून येथे आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मात्र यातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत काँग्रेस कार्यकर्ते निष्काळजीपणे फटाके फोडताना दिसत आहेत. यातच एका दुर्घटनेतून काँग्रेस नेते थोडक्यात बचावले आहेत. काँग्रेस नेता हातात फटाक्यांचा एक बॉक्स घेऊन फटाके फोडत असल्याचं दिसत आहे. ज्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. या व्हिडीओही समोर आला आहे. (Viral Video)

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, फटाके पेटवताना काँग्रेस नेत्याचा तोल जाताना दिसत आहे. तोल गेल्याने त्यांच्या हातातला बॉक्स जमिनीवर पडतो. मात्र फटाके फुटत राहतात. त्यात ते तो बॉक्स उचलण्याचा प्रयत्न करतात, तितक्यात एक फटाका फुटतो आणि त्यांच्या डोळ्याच्या जवळून निघतो. यातच थोडीही जारो चूक झाली असती, तर त्यांना मोठी इजा होऊ शकली असती. (Viral Video) (Latest Marathi News)

Congress Delhi Office Celebration
Karnataka Elections Results 2023: मोठी बातमी! कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव

एएनआय या वृत्तसंस्थेनेही या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. 1 मिनिट 41 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक लहानशी गोष्ट कशी मोठी दुर्घटनेत बदलू शकली असती, हे दिसत आहे. यातच आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेनंतर दुसरा काँग्रेस कार्यकर्ता आला आणि त्यानेही हीच कृती केली. (Viral Video)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com