Karnataka Elections Results 2023: मोठी बातमी! कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव

मोठी बातमी! कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव
Jagadish Shettar
Jagadish ShettarSaam tv

Karnataka Elections Results 2023: कर्नाटकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadhish Shettar) यांचा पराभव झाला आहे. शेट्टर यांनी निवडणुकीदरम्यान भाजपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हुबळी धारवाड मध्य मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांचा पराभव झाला आहे. त्यांचा भाजपच्या महेश टेंगीनकाई यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

Jagadish Shettar
Karnataka Elections Results: कर्नाटकात कमळ कोमेजले! पराभवानंतर बोम्मईंची पहिली प्रतिक्रिया; 'काही दिवसात...'

शेट्टर हे भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी यावेळी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना त्याच हुबळी धारवाड मतदारसंघातून उमेदवारी दिली, जिथे ते भाजपच्या तिकिटावर आमदार होते.

२०१८ मध्ये याच जागेवरून मोठ्या फरकाने जिंकले होते

या जागेसाठी भाजपला सोडचिठ्ठी देणारे जगदीश शेट्टर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीतही हुबळी धारवाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. जगदीश यांनी भाजपकडून निवडणूक लढवताना काँग्रेसचे डॉ. महेश नलवाड यांचा ७५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. (Latest Marathi News)

Jagadish Shettar
Karnataka Elections Results 2023: मोदी- शहांच्या सभाही ठरल्या सपशेल फेल; या ६ कारणांमुळे भाजपचा पराभव

त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि या जागेवर तीनदा विजय मिळवला. यावेळी भाजपने शेट्टर यांना या जागेवरून तिकीट नाकारले होते. त्यामुळे संतापलेल्या शेट्टर यांनी बंडखोरी केली. भाजपला रामराम ठोकत त्यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांना प्रभाव सामना करावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com