Karnataka Elections Results: कर्नाटकात कमळ कोमेजले! पराभवानंतर बोम्मईंची पहिली प्रतिक्रिया; 'काही दिवसात...'

Basavaraj Bommai On Karnataka VidhanSabha Election Result: पराभवाकडे वाटचाल करत असतानाच माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Basavaraj Bommai
Basavaraj BommaiSaamtv

Congress Vs BJP in Karnataka Elections Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून राज्यात काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून ट्रेंडमध्ये पक्ष 123 जागांवर आघाडीवर दिसत आहे.

तर भाजपकडे अवघ्या 70 जागा आहेत. तर जेडीएसला 26 जागा मिळाल्या आहेत. भाजप पराभवाकडे वाटचाल करत असतानाच भाजपचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Basavaraj Bommai
Karnataka Elections Results 2023: मोदी- शहांच्या सभाही ठरल्या सपशेल फेल; या ६ कारणांमुळे भाजपचा पराभव

कॉंग्रेसचा ऐतिहासिक विजय...

10 मे रोजी कर्नाटकात (Karanataka Election Result) 224 जागांसाठी मतदान झाले होते. सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र काँग्रेसने भाजपला सत्तेतून हुसकावून लावले आहे. या पराभवानंतर भाजपचे नेते बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले बोम्मई...

"आम्ही पुन्हा राज्यात परतणार असून आगामी निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, येत्या काही दिवसांत निकालाचे विश्लेषण करून लोकसभा निवडणुकीत पुनरागमन करणार आहे. आम्ही पक्षाची पुनर्रचना करू. आम्ही अंतिम निकालांची वाट पाहत आहोत," असे म्हणत बसवराज बोम्मई यांनी पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Basavaraj Bommai
Chandrapur Accident: वाजत-गाजत वरात निघाली; वाटेतच काळाचा घाला, ५० वऱ्हाड्यांसह बस थेट नाल्यात कोसळली

दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर कॉंग्रेसमध्ये (Congress) चांगलाच जल्लोश पाहायला मिळत आहे. बंगळुरूपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसच्या समर्थकांचा जल्लोष पहायला मिळत असून बंगळुरूमधील पक्ष कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक आनंद साजरा करत आहेत. तसेच दिल्लीतील मुख्यालयातही आनंदोत्सव साजरा होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com