Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023 Saam TV
देश विदेश

Karnataka Election Result Live 2023: विजयपूरमध्ये सलग चौथ्यांदा काँग्रेसचा विजय; भाजपचा दारुण पराभव

Ruchika Jadhav

विजयपूरमध्ये सलग चौथ्यांदा काँग्रेसचा विजय; भाजपचा दारुण पराभव

विजयपूर जिल्ह्यात काँग्रेसचा तिसरा उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसचे माजी गृहमंत्री एम. बी. पाटील यांना जास्त मते मिळली आहेत. विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर मतदार संघातून सलग चौथ्यादा त्यांनीच मुसंडी मारल्याचे दिसत आहे. भाजप उमेदवार विजूगौडा पाटील यांचा पराभव झालाय.

कर्नाटकातील माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकाल हाती येऊ लागले आहेत. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव झाला आहे. जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

बेळगावात भाजपची मुसंडी; सलग चौथ्यांदा मिळवला दणदणीत विजय

बेळगाव दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील विजयी झाले आहेत. एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर यांचा पराभव झाला आहे. हुबळीमधून जगदीश शेट्टार यांचाही पराभव झाला आहे.बेळगाव दक्षिण मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

निकाल शेवटच्या टप्प्यात असूनही जल्लोष नाही; विजयपूरात कलम 144 लागू

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होत असताना. विजयपूर शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मतदानादिवशी विजयपूर शहरात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे शहरात पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येण्यास प्रशासनाकडून मज्जाव करण्यात येतोय. निवडणूक निकालानंतर शहरात जल्लोष करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय.

काँग्रेसने बेळगाव दक्षिणमध्ये उघडलं खातं; टी. रघूमृर्ती १६ हजार मतांनी विजयी

कर्नटकात काँग्रेसने पहिलं खातं उघडलं आहे. काँग्रेसचा बेळगाव दक्षिणमध्ये उमेदवार टी. रघूमृर्ती विजयी झाले आहे. बेळगाव दक्षिणमध्ये उमेदवार टी. रघूमृर्ती हे १६ हजार मतांनी विजयी झाले आहे .

बजरंग बलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत असताना राज्यात काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. यावरून संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकमध्ये फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा भाजपाच्या डोक्यावर पडली.

भाजपचे नेते जीडीएसच्या संपर्कात? काँग्रेसची सावध भूमिका

कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजप पिछाडीवर गेली आहे. भाजप आतापर्यंत ७५ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस २९ जागांवर आघाडीवर आहे. याचदम्यान, भाजपचे नेते जीडीएसच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे. तर यानंतर काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.

कर्नाटकात राष्ट्रवादीचं खातं उघडणार? निपाणीतून उत्तम पाटील आघाडीवर

निपाणी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली आहे. तर निपाणीत भाजपच्या शशिकला जोल्ले, काँग्रेसचे काकासाहेब पाटील पिछाडीवर आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी कर्नाटकात खातं उघडणार का, हे पाहावे लागणार आहे.

काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; भाजप ८२ जागांवर आघाडीवर

कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटकात काँग्रेस १२० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ८२ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस १९ जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटकात काँग्रेसची जोरदार मुसंडी; भाजप किती जागांनी मागे?

काँग्रेस – १०७

भाजपा – ८०

जेडीएस – ३१

इतर – ००

कर्नाटकात काँग्रेसची सेंच्युरी; आतापर्यंत १८३ जागांचा कल हाती

कर्नाटकात काँग्रेस १०० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ८० जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत १८३ जागांचा कल हाती आला आहे.

कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपमध्ये 'काँटे की टक्कर'

कर्नाटकात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. भाजप ५० , काँग्रेस ४० आणि जेडीएस ०६ जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटकात मतमोजणीला सुरुवात; सत्तेच्या चाव्या कोणाला मिळणार, काँग्रेस की भाजप?

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 224 जागांसाठी 10 तारखेला मतदान पार पडलं.भाजप, काँग्रेस आणि जेडीएस अशी तिरंगी लढत कर्नाटकात पाहायला मिळत आहे. साधारण दुपारपर्यंत राज्यातील सत्तेच्या चाव्या कोणाला मिळेल हे स्पष्टी होईल.

आम्हाला ५० जागा मिळणारच; निकालापूर्वी कुमारस्वामींनी ठामपणे सांगितलं

कुमारस्वामी आज सिंगापूरला रवाना होणार आहेत. त्याआधी त्यांनी सकाळी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी धजदला (JDS) ५० जागा मिळतील, असं मत व्यक्त केलं आहे. JDS फार कमी जागांवर जिंकेल, असा अंदाज अनेक सर्वेक्षणांनी वर्तवला आहे; मात्र आमच्या पक्षाला ५० जागा मिळतीलच, असं कुमारस्वामींनी म्हटलं आहे.

कर्नाटकात भाकरी फिरणार का? जनतेचा कौल कोणाला मिळणार?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज निकाल असल्याने सर्वांच्याच मनातील धाकधूक वाढली आहे. कर्नाटकात कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. बहुमतासाठी लागणारी आकडेवारी 113 आहे. अशात मतदानानंतर समोर आलेल्या एक्झीट पोलमधून काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसत आहे. 5 पैकी 4 संस्थांच्या एक्झीट पोलमध्ये भाजप मागे पडणार असल्याचं निरीक्षण दिसलं आहे. त्यामुळे आज सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष काँग्रेस आणि जेडीएस या पैकी कोणता पक्ष मुसंडी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कर्नाटकच्या जनतेचा कौल कुणाल?; भाजप, काँग्रेस की जेडीएस

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी 10 मे रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आज (शनिवारी) सकाळी ८ वाजता राज्यभरात ३६ केंद्रांवर मतमोजणी सुरू होणार असून, थोड्याचवेळात निकाल जाहीर होणार आहे. (Karnataka VidhanSabha Election Result)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SCROLL FOR NEXT