Nandurbar Accident News Saam tv
देश विदेश

Karnataka Accident : देवदर्शनावरुन परतताना भाविकांवर काळाचा घाला, अपघातात ७ जणांचा मृत्यू

Accident News : खाणकामातील दोन टिप्पर लॉरी आणि क्रूझर कार यांच्यात ही भीषण टक्कर झाली.

प्रविण वाकचौरे

Karanataka Accident :

कर्नाटकातील विजयनगरमध्ये विचित्र रस्ते अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजयनगरमधील होसपेटजवळ तीन वाहनांची धडक जोरदार झाली. खाणकामातील दोन टिप्पर लॉरी आणि क्रूझर कार यांच्यात ही भीषण टक्कर झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझरमध्ये १३ जण प्रवास करत होते. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

हॉसपेट शहराच्या बाहेरील मरियमनहल्ली पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली. लॉरीचा एक्सल तुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हॉसपेट येथील रहिवासी बसवेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

विजयनगरचे एसपी श्रीहरी बाबू यांनी म्हटलं की, होसपेटजवळ झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. टिप्पर आणि क्रूझर यांच्यात हा अपघात झाला. क्रूझरमध्ये 13 प्रवासी प्रवास करत होते. जखमींची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT