Accident Twitter/@ANI
देश विदेश

Accident: कर्नाटकात बस उलटून ८ जणांचा मृत्यू; २० प्रवासी गंभीर

जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बेंगळुरू - कर्नाटक येथील तुमकूरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला. कर्नाटकातील (Karnataka) तुमकूर जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात (Accident) 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे. तुमकूर पोलिसांनी दिलेल्या माहितीवर, तुमकूर जिल्ह्यातील पावागडाजवळ बस उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या बसमधून एकूण ६० जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर बस उलटली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकांनी आणि प्रशासनाने तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या अश्रूंचा बांध फुटला | VIDEO

Ajit Pawar Death News LIVE Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीत दाखल

Ajit Pawar Death : "माझा देव चोरला, माझ्या आई-वडीलांनंतर..."; अजित पवारांच्या निधनानंतर सूरज चव्हाणची Emotional पोस्ट

मुलगा सकाळी सकाळी घरातून बाहेर पडला, टीव्हीवर विमान अपघातात मृत्यूची बातमी बघितली अन् आईच्या अश्रूंचा बांध फुटला

Maharashtra Live News Update: केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू पुणे विमानतळावर दाखल

SCROLL FOR NEXT