Siddaramaiah vs DK Shivakumar saam Tv
देश विदेश

Karnataka Politics: हो, मीच राहणार 5 वर्ष मुख्यमंत्री; सिद्धारमय्या यांचा दावा, कर्नाटकातील संघर्ष मिटणार की चिघळणार?

Siddaramaiah vs DK Shivakumar: काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावर वाद सुरू आहे. भाजप नेत्यांच्या या दाव्यालाही सिद्धरामय्या यांनी उत्तर दिले. आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केलाय.

Bharat Jadhav

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात मोठा गदारोळ पाहायला मिळतोय. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याऐवजी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवले जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. याच चर्चांमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना पूर्णविराम लावलाय. आपणचं ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचं सिद्धरामय्या यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी पुन्हा एकदा राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तेच पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहतील, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, 'हो, मी पाच वर्षे मुख्यमंत्री राहीन, तुम्हाला काही शंका आहे का?' त्यांच्या या विधानानंतर कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आलेत.त्यामुळे कर्नाटकमधील सत्तासंघर्ष मिटला की, चिघळणार हे पाहणं औत्सुक्यांच ठरणार आहे.

डीके शिवकुमार आता काय करतील?

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, 'माझ्याकडे काही पर्याय नाही. मला त्यांच्यासोबत उभे राहावे लागेल, मला त्यांना पाठिंबा द्यावा लागेल.' हायकमांड जे म्हणतील, 'मला ते करावेच लागेल.' कर्नाटकातील दोन्ही वरिष्ठ नेत्यांची विधाने, अशावेळी आली आहेत, जेव्हा पक्षाच्या आमदारांनी काही दिवसांपासून शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवा मागणी केली होती.

सिद्धरामय्या यांचे हे विधान राज्य सरकारमधील संभाव्य नेतृत्व बदलाबद्दल सुरू असलेल्या राजकीय चर्चेवर पडदा टाकणारे आहे. कारण भारतीय जनता पक्ष आणि जेडीएसने काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचा दावा केला होता.

तर मंगळवारी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनीही कर्नाटकात नेतृत्व बदलाची कोणताही प्लॅन नाही असं म्हटलं होतं. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू आहे, असा दावा तेथील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून करण्यात येत होता. भाजपच्या नेत्यांच्या दाव्यालाही सिद्धरामय्या यांनी आता उत्तर दिले. भाजप काहीही दावा करेल, ते आमचे हायकमांड आहेत का?

पक्षात असंतोष नाही - शिवकुमार

डीके शिवकुमार यांनीदेखील राज्यात नेतृत्व बदलावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटलंय. काँग्रेसमध्ये कोणताही असंतोष नाही. सिद्धरामय्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नेतृत्वाच्या मुद्द्यावर कोणत्याही वादाची गरज नाही, असं शिवकुमार म्हणालेत. दरम्यान मे २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात वाद सुरू झाला होता. डीके शिवकुमार यांच्या मागे मोठा जनाधार होता. मात्र काँग्रेसने त्यांच्याऐवजी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री बनवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT