D.K. Shivakumar meets the Governor ahead of being sworn in as the next Chief Minister of Karnataka on June 3. saam tv
देश विदेश

संपूर्णं मंत्रिमंडळ बरखास्त! राज्याला मिळणार नवीन मुख्यमंत्री; ३ जूनला होणार शपथविधी

DK Shivakumar New Chief Minister Karnataka 2026: कर्नाटकमध्ये मोठा राजकीय बदल होत असून सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर डी.के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Omkar Sonawane

कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून डी.के शिवकुमार यांची काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून ते आता कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री होतील. 3 जून रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. शुक्रवारी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शुक्रवारी सिद्धरामय्या यांचा राजीनामा स्वीकारला आणि मंत्रिमंडळ बरखास्त केले. आतापर्यंत शिवकुमार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. आज झालेल्या बैठकीत काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी के.सी. वेणूगोपाल आणि रणदीप सुरजेवाला हे होते.

कर्नाटक राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के शिवकुमार यांनी शनिवारी दुपारी लोकभवन येथे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. शपथविधी सोहळा लोक भवनात घ्यावा की विधानभवनात घ्यावा यावर विचारविनिमय सुरू असून विधानभवनात तयारी सुरू असल्याचे दिसून आले. नवीन मंत्रिमंडळाची स्थापना आणि सत्ता बदलावर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेतली.

मंत्रिपदासाठी इच्छुक असलेलेल आमदार दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले असून हायकमांडजवळ लॉबींग करत आहेत. तर सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात असणारे काही मंत्री देखील आपली जागा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर काही आमदार देखील राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मांत्रिमंडळात नवख्या आणि जुन्या अशा दोघांना संधी दिली जाईल.

जातीय समीकरणे लक्षात घेता आणि सिद्धरामय्या यांचे काही निष्ठावान आमदारांमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री कर्नाटक राज्याला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सिद्धरामय्या यांचे सुपुत्र जे विधानपरिषदेवर आमदार आहेत. त्यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Accident: मुंबई- गोवा महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव कारची कंटेनरला धडक; आई अन् मुलीचा जागीच मृत्यू

पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन; मिथेनॉलचा मोठा साठा जप्त; IAS तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

Bhadra Rajyoga: उद्या बुध बनवणार भद्र राजयोग; या राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसे

Skin Care: पार्लरमध्ये पैसे खर्च नकरता चेहरा दिसेल नॅचरल ग्लो, १ महिना प्या 'हा' स्पेशल चाहा

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT