Karnataka Opinion Poll 2023 Saam TV
देश विदेश

Karnataka Opinion Poll 2023: कर्नाटकात बहुमताची शक्यता असतानाही काँग्रेसमध्ये तणाव, भाजपसाठी आनंदाची बातमी

कर्नाटकात बहुमताची शक्यता असतानाही काँग्रेसमध्ये तणाव, भाजपसाठी आनंदाची बातमी

Satish Kengar

Karnataka Election Assembly 2023: कर्नाटकात येत्या 10 मे राजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत मुख्यतः भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातच लढत आहे. सध्या राज्यात भाजपची सत्ता असून बसवराज बोम्मई मुख्यमंत्री आहेत.

मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताचा दावा करत आहे. पक्षाने 150 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून समोर आलेल्या विविध सर्वेक्षणांमध्ये काँग्रेस बहुमताचा आकडा पार करत असल्याचे दिसत आहे. असं असलं तरीही काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण आहे.

एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने केलेल्या ताज्या सर्वेक्षणामध्ये बहुमत असूनही गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या जागा कमी झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस समोर आलेल्या सर्वेक्षणात आणि आज समोर आलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या जागा वाढताना दिसत आहे. तर काँग्रेसच्या जागा कमी होताना दिसत आहे.  (Latest Marathi News)

मात्र तरीही काँग्रेस बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे. भाजपसाठी एक आनंदाची बातमी आहे की, मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत त्यांच्या जागा वाढल्या आहेत. कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांना सुरुवात झाली आहे. याशिवाय रोड शोही होत असून यामुळे मतदार भाजपच्या बाजूने वळताना दिसत असल्याचं या सर्वेक्षणातून दिसत आहे.

Karnataka Opinion Poll 2023: सर्वेक्षणात कोणाला किती जागा मिळाल्या?

एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने कर्नाटकातील २२४ जागांसाठी केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसला १०७ ते ११९ जागा मिळू शकतात, असे समोर आले आहे.

त्याचवेळी भाजपला ७४ ते ८६ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जेडीएसला २३-३५ जागा जिंकण्यातही यश मिळू शकते. इतरांच्या खात्यात पाच जागा जाऊ शकतात. या सर्वेक्षणात वृत्तसंस्थेने १७,७७२ लोकांचे मत घेतले आहे.

भाजपला दिलासा

सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, २९ मार्चच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला ६८ -८० जागा मिळत होत्या, तर आता या जागा ७४-८६ पर्यंत वाढल्या आहेत. काँग्रेसला मार्चमध्ये ११५-१२७ जागा मिळत असल्याचं दिसत होतं, आता त्या १०७-११९ वर आल्या आहेत. मात्र, जेडीएसच्या जागांमध्ये कोणताही बदल होताना दिसत नाही. दोन्ही सर्वेक्षणात जेडीएसला २३-३५ जागा देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT