Karnataka High Court Saam Tv
देश विदेश

Karnataka High Court : टॉयलेटच्या भिंतीवर महिलेचा मोबाइल नंबर लिहिणं म्हणजे लैंगिक शोषण; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

Karnataka Latest News: पुरूषांच्या शौचालयातील भिंतीवर विवाहित महिलेचा मोबाईल नंबर लिहून कॉल गर्ल लिहिणे हा लैंगिक छळ आहे, अशी महत्वाची टिपण्णी कर्नाटकच्या हायकोर्टाने केली आहे.

Priya More

बऱ्याचदा पुरूषांच्या शौचालयांच्या भिंतींवर महिलांचे मोबाईल नंबर (Mobile Number) लिहिले जात असल्याचे तुम्ही देखील पाहिले असेल. पण असे करणे हा गुन्हा आहे. याबाबत आता कोर्टानेच महत्वाचा निकाल दिला आहे. पुरूषांच्या शौचालयातील भिंतीवर विवाहित महिलेचा मोबाईल नंबर लिहून कॉल गर्ल लिहिणे हा लैंगिक छळ (Sexual Harassment) आहे, अशी महत्वाची टिपण्णी कर्नाटकच्या हायकोर्टाने केली आहे. कर्नाटकातील एका महिलेसोबत असाच प्रकार घडला होता. याप्रकरणावर सुनावणी करताना हायकोर्टाने (Karnataka High Court) ही महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे.

कर्नाटकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या महिलेने सरकारी कामासाठी आपला मोबाईल नंबर त्याच ठिकाणी काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला दिला होता. पण अचानक या महिलेला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कधीही फोन येऊ लागले. यामधील काहींनी या महिलेसोबत आक्षेपार्ह भाषेमध्ये बोलण्यास सुरूवात केली. तर काहिंनी शिवीगाळ केला आणि धमकी देखील दिली. त्यामुळे ही महिला प्रचंड घाबरली.

याप्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. बंगळुरूमधील पुरूषांच्या शौचालयातील भिंतीवर या महिलेचा मोबाईल नंबर कॉल गर्ल म्हणून लिहिला होता. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३८ वर्षीय अल्ला बक्ष पटेलविरोधात गुन्हा दाखल केला. पटेलने असे का केले याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अल्ला बक्ष पटेलने आरोपपत्र रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Constipation relief tips: सकाळी उठताच पाणी प्यायल्यास खरोखरच पोट साफ होतं का?

Silent heart attack: शरीरात ही ५ विचित्र लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅकचा आहे धोका

Makeup Tips: उन्हाळ्यात लग्नसराईसाठी १० मिनिटात असा करा ग्लॅमरस मेकअप, घाम आल्यावरही मेकअप तसाच राहिलं

Tamil Nadu Politics : थलापती विजय यांच्यासमोर पेच वाढला; राज्यपालांनी दुसऱ्यांदा माघारी धाडलं, TVK समोर पर्याय काय?

Maharashtra News Live Update: वांगणी आणि परिसरात जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT