Prajwal Revanna Saam Tv
देश विदेश

Prajwal Revanna: प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ, अटकेसाठी ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Global Lookout Notice Issued Against Prajwal Revanna: कथित कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणाची चौकशी एसआयटी (SIT) मार्फत सुरू आहे. याप्रकरणात आता प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अटकेसाठी ग्लोबल लूकआउट नोटीस जारी करण्यात आले आहे. स्वतः कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर यांनी ही माहिती दिली.

Priya More

कर्नाटकच्या राजकारणात (Karnataka Politics) मोठी खळबळ उडाली आहे. अनेक महिलांकडून लैंगिक छळाचे आरोप असलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि खासदार प्रज्ज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कथित कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणाची चौकशी एसआयटी (SIT) मार्फत सुरू आहे. याप्रकरणात आता प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अटकेसाठी ग्लोबल लूकआउट नोटीस जारी करण्यात आले आहे. स्वतः कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर यांनी ही माहिती दिली.

कथित कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरोधात आता सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणावर मौन सोडत प्रज्ज्वल यांनी तपास करणाऱ्या विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी ७ दिवसांचा अवधी मागितला आहे. यावर परमेश्वर यांनी सांगितले की, '24 तासांपेक्षा जास्त वेळ देण्याची तरतूद नाही. प्रज्ज्वल रेवण्णा परदेशात गेल्याची माहिती मिळताच ग्लोबल लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. आम्ही सर्व बंदरे आणि विमानतळांना लुकआउट नोटीसबद्दल माहिती दिली आहे.' जगातील सर्व इमिग्रेशन पॉईंट्सना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

33 वर्षीय प्रज्ज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान आणि जेडीएस सुप्रीमो एचडी देवेगौडा यांचा नातू आणि आमदार आणि माजी मंत्री एचडी रेवण्णा यांचा मुलगा आहे. त्याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. प्रज्ज्वल कर्नाटकातील हासन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. याठिकाणी 26 एप्रिल रोजी मतदान झाले होते.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदाराशी संबंधित व्हिडिओ समोर येताच मतदान संपल्यानंतर तो देश सोडून पळून गेला. गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की, 'आरोपींना वेळ द्यायचा की नाही हे आमचे एसआयटी सदस्य कायदेशीर मत घेत आहेत. २४ तासांपेक्षा जास्त वेळ देण्याची तरतूद नसल्याने एसआयटी त्यांना अटक करण्यास तयार आहे.

एका महिलेने प्रज्ज्वल आणि त्यांच्या वडिलांविरोधात लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावर गृहमंत्री म्हणाले की,'आणखी एका मिहिलेची तक्रार समोर आली आहे. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसंच, आणखी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. ज्याचा तपशील अता शेअर करू शकत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT